💥ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाजवळ भारतीय जनता पार्टीचे आंदोलन...!


💥लुईसवाडी भागातील रस्त्यांवरील खड्डय़ांमध्ये बसून भाजपाच्या महिला आघाडीने सेल्फी आंदोलन केले💥

ठाणे : सत्ताधारी शिवसेनेला शहरातील खड्डय़ांच्या मुद्दय़ावरून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीकडून करण्यात आला पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे वास्तव्य असलेल्या लुईसवाडी भागातील रस्त्यांवरील खड्डय़ांमध्ये बसून भाजपाच्या महिला आघाडीने सेल्फी आंदोलन केले. 

या वेळी ‘ठाण्याचे खड्डे, खड्डय़ांचे ठाणे’अशी घोषणाबाजी पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी केली तसेच ‘खड्डय़ांसोबत सेल्फी’ काढून महापालिका आणि सत्ताधारी शिवसेनेच्या कारभाराचा निषेध व्यक्त केला दरम्यान हे आंदोलन निव्वळ राजकारणासाठी केले जात असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. राज्यात आणि ठाणे महापालिकेत शिवसेनेची सत्ता असल्याने भाजपाला त्रास होत आहे, त्यामुळे ही स्टंटबाजी सुरू आहे अशी टीका माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या