💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - मागील चोवीस तासातील महत्वाच्या बातम्या...!


💥जातीनिहाय जनगणनेबाबत योग्य तो निर्णय घेऊ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं बिहारच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाला आश्वासन💥

  ✍️ मोहन चौकेक

1) यंदाही दहीहंडीला परवानगी नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या दहीहंडी उत्सव आयोजकांच्या बैठकीत निर्णय.

2) पूरग्रस्तांसंदर्भातील आदेश आठ दिवसात बदला अन्यथा सामूहिक जलसमाधी घेऊ; राजू शेट्टी यांचा राज्य सरकारला इशारा.

3) मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू; खाजगी सावकारांच्या छळाविरोधात आवाज उठवण्यासाठी मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न.

4) गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिका आणि गणेशोत्सव समन्वय समितीची बैठक संपन्न; गेल्यावर्षीची नियमावली कायम राहणार.

5) राज्याला सद्यस्थितीत कुठलाही अलर्ट नाही, तिसऱ्या लाटेसाठी राज्याची तयारी पूर्ण; घाबरु नका पण काळजी घ्या, आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं स्पष्टीकरण.

6) सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यांत निर्बंध शिथील; सर्व दुकानं दुपारी चार वाजेपर्यंत सुरु राहणार, तर लग्नासाठी 50 जणांना मुभा.

7) जातीनिहाय जनगणनेबाबत योग्य तो निर्णय घेऊ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं बिहारच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाला आश्वासन. 

8) मुंबईत हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; टीव्ही इंडस्ट्रीमधील मोठी नावं पुढे येण्याची शक्यता.

9) टोकियो पॅरॉलिम्पिकसाठी भारताचे 54 खेळाडू सज्ज; टोकियोमध्ये 24 ऑगस्टपासून पॅरॉलिम्पिकला होणार सुरुवात....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या