💥पुर्णेत डेंग्यू सदृष्य तापीसह साथींच्या आजारांचे अक्षरशः थैमान ; अस्वच्छ परिसर तुंबलेल्या नाल्यांमुळे डासांच्या झुंडी बेभान...!


💥नगर परिषद प्रशासनासह आरोग्य प्रशासनाला प्रतिकात्मक उपाययोजना करण्याचे यत्किंचितही नाही भान💥

पुर्णा (दि.२७ ऑगस्ट २०२१) - कोरोना महामारीच्या दहशतीतून सावरण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या सर्वसामान्य जनतेला पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात फैलावत असलेल्या डेग्यू सदृष्य ताप,हिवताप मलेरीया,टायफाईड,काविळ,,चिकनगुनीया या सारख्या विविध साथीच्या आजारांना अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतही सामोरे जावे लागत असल्याचे निदर्शनास येत असून शासकीय ग्रामीण रुग्णालय शहरापासून तब्बल तिन किलोमीटर अंतरावर पुर्णा-ताडकळस मार्गावर असल्यामुळे नाईलाजास्तव नागरिकांना शहरातील खाजगी रुग्णालयांमध्ये स्वतःसह स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांच्या विलाजासाठी जावे लागत असल्यामुळे खाजगी रुग्णालयांच्या परिसरात अक्षरशः जत्रेचे स्वरूप आल्याचे निदर्शनास येत असून या भयंकर अश्या परिस्थितीत सर्वसामान्य गोरगरीब जनतेला खाजगी सावकारांचे अंगन तुडवून खाजगी रुग्णालयांची वेळोवेळी वारी करावी लागत असल्याने शेवटी 'मरता क्या नही करता' या उत्कीचा अवलंब करून खाजगी रुग्णालयांसह औषधी विक्रेत्यांच चांगभल कराव लागत असतांना मात्रा आरोग्य प्रशासन व नगर परिषद प्रशासन निर्लज्जपणाचा कळस गाठत यावर उपाययोजना करण्याऐवजी परिस्थिती हाताबाहेर जाण्याची वाट पाहत आहे की काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

💥खाजगी दवाखान्यात रुग्णांची वाढती संख्या देत आहे कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेचे संकेत ;-


कोरोना महामारीची दुसरी लाट ओसरल्याने जनजिवन पुर्वपदावर येत असतानांच आरोग्य प्रशासनाने कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेच्या धोक्याचे संकेत दिले असतांनाच बदलत्या हवामानानुसार व नगर परिषद प्रशासनासह आरोग्य विभागाच्या निश्क्रिय कारभारामुळे शहरातील मस्तानपुरा,गवळी गल्ली,अजिज नगर,आनंद नगर,आदर्श कॉलनी,महाविर नगर,डोबी गल्ली,कोळीवाडा,धनगर वाडा,अण्णाभाऊ साठे नगर,हरिनगर,पंचशिल नगर,साळुबाई गल्ली,गणपती मंदिर परिसर आदीं परिसरांसह शहरातील विविध भागातील नागरी वसाहतींमध्ये नाल्यांची झालेली बांधकाम अत्यंत निकृष्ट आणी चुकीच्या पध्दतीने करण्यात आल्याने परासरातून वाहणारे सांडपाणी जागोजाग जमा होऊन हे गलीच्छ सांडपाणी परिसरातील खड्ड्यांमध्ये जमा होत असल्यामुळे डासांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढून या डासांच्या झुंडी परिसरातील नागरिकांवर अक्षरशः तुटून पडत असल्यामुळे परिसरात डेंग्यू सदृष्य तापामुळे कुटुंबच्या कुटुंब फनफनतांना दिसत असून प्रत्येक घराघरात तापीमुळ फनफननारे रुग्ण आढळून येत आहेत डेंग्यू,मलेरीया,टायफाईड,काविळ,चिकनगुनीया मुळे नागरिक त्रस्त झाल्याचे दिसत असतांना नगर परिषद प्रशासनासह आरोग्य प्रशासन कुठल्याही प्रकारे उपाययोजना करतांना दिसत नसून शहरातील काही विशिष्ट भागात धुर फवारणी करण्याचे नाट्य मात्र सोईस्करित्या रंगवण्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारची उपाययोजना अद्याप पर्यंत केल्याचे निदर्शनास नाही.

💥खाजगी रुग्णालयांचा एकच ध्यास 'बनी तो बनी नही तो भागों नांदेड-परभणी'...


शहरातील काही खाजगी रुग्णालयात रुग्णांच्या जिविताशी खेळण्याचा प्रकार सातत्याने होत असल्याचे निदर्शनास येत असून शहरात डेंग्यू सदृष्य तापासह चिकन गुनीया या भयंकर आजाराची लागन झालेल्या रुग्णांना रक्त-लघवी तपासणी केल्यानंतर या रोगाची चिन्ह आढळून आल्यास तात्काळ पुढील विलाजासाठी परभणी-नांदेड येथील मोठ्या रुग्णालयात पाठवण्याऐवजी सात ते आठ दिवस स्वतःच्या खाजगी रुग्णालयात भरती करून त्या रुग्णांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक सोशन केल्या जात असून परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर मात्र 'बनी तो बनी नही तो भागों नांदेड-परभणी' या परंपरे प्रमाणे नांदेड किंवा परभणीला जाण्याचा सल्ला महाविर नगर परिसरात भव्य खाजगी रुग्णालय थाटून बसलेल्या पुर्वी ताडकळस व आता सेलू येथील शासकीय रुग्णालयात कार्यरत एका शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याने आरंभल्याचे निदर्शनास येत आहे.

💥शहरी भागातील नागरिकांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्राची आवश्यकता ;-


शासकीय ग्रामीण रुग्णालयात विलाजासाठी जाणे सर्वसामान्य गोरगरीब जनतेला आर्थिक दृष्ट्या परवडत नसल्यामुळे अनेकांना विलाजाअभावी दुःखन अंगावर काढण्याची वेळ आली असून असंख्य गोरगरीब रोजमजूर शेतमजूर कुटुंब डेंग्यू सदृष्य तापामुळे व चिकनगुनीया आजारामुळे हात-पाय सुजल्याने अक्षरशः तडफडत असतांना मात्र आरोग्य प्रशासन निर्लज्जपणाचा कळस गाठतांना पाहावयास मिळत असून शहरात प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापण करण्याच्या दृष्टीने कुठल्याही प्रकारची उपाययोजना करीत नसल्यामुळे संताप व्यक्ता केला जात आहे.

💥पुर्णा नगर परिषद प्रशासनाने शहरातील स्वच्छतेसह प्रत्येक भागात धुरफवारणी करणे आवश्यक ;-


पुर्णा नगर परिषद प्रशासनाच्या निश्क्रिय कारभाराचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत असून नगर परिषदेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्यामुळे व प्रभारी मुख्याधिकारी सोनवने उंटावरून शेळ्या हाकल्यागत कारभार करीत असल्याने त्यांची प्रशासनावर कुठलीही पकड नसल्यामुळे आरोग्य व स्वच्छता विभागाचा कारभार इत के दिवस रामभरोसेच होता त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा अक्षरशः खेळखंडोबा झाल्याने शहरातील जागोजाग साचलेल्या नाल्या डोबकाड कचऱ्याचे ढिग डासांच्या संख्यावाढीला कमालीचे प्रोत्साहन देत आहे त्यामुळे शहरात साथींचे आजार मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना स्वतः या गंभीर परिस्थितीकडे लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या