💥पुर्णा पोलिस स्थानकात साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०१ वी जयंती उत्साहाने साजरी....!


💥पो.नि.सुभाषचंद्र मारकड यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुजन करून केले अभिवादन💥


पुर्णा (दि.०१ अॉगस्ट) - पुर्णा पोलिस स्थानकात पोलिस प्रशासनाच्या वतीने आज रविवार दि.०१ अॉगस्ट २०२१ रोजी सकाळच्या सुमारास साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०१ वी जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली.


यावेळी साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुर्णा पोलिस स्थानकाचे पो.नि.सुभाषचंद्र मारकड यांनी पुष्पहार अर्पण करून प्रतिमेचे पुजन करीत अभिवादन केले यावेळी पुर्णा पोलिस स्थानकाचे सपोनि.दिनेश मुळे,पोलिस उपनिरिक्षक पोपलवार,पो.ना.समीर अख्तर पठाण,हेकॉ.विजय जाधव,शिंदे आदींसह कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.....  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या