💥महाराष्ट्र शासनाने केला सार्वजनिक आरोग्य विभाग भरतीमध्ये पुरुष परीचारकांवर अन्याय...!


💥शासनाने महिला उमेदवार संख्या 90%व पुरुष उमेदवार फक्त संख्या 10%असा लिंग भेदभाव केला💥 

पुणे ; दिनांक 04/08/2021 रोजी जाहीर करण्यात आलेल्या आरोग्य विभागाच्या भरतीमध्ये महाराष्ट्र शासनाने महिला उमेदवार संख्या 90%व पुरुष उमेदवार फक्त संख्या 10%असा लिंग भेदभाव केला असुन त्याबद्दल संपुर्ण महाराष्ट्रामध्ये पुरुष परिचारकां मध्ये संतापाची लाट पसरली असून महाराष्ट्र शासनाने त्यावर तात्काळ दखल घेऊन वेळीच कारवाही करावी अन्यथा संपुर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. यासाठी होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आज मा. अर्चना पाटील आरोग्य सेवा संचालक-  पुणे, यांना तसेच माननिय आमदार संजयभाऊ दौंड साहेब यांना  ही निवेदन दिले, त्यावेळी मॅडम व माननिय संजय दौंड यांनी तात्काळ दखल घेऊन पुढील कार्यवाहीचे आश्वासन दिले.

प्रसंगी  प्रा.सतिष चौरे,सचिन लहाने, भक्ताराम फड,वासुदेव माने,लहू केदार, नीळकंठ होळंबे, किरण नरुटे, वैभव घुगे, प्रा.नितीन होळंबे, प्रा.राम होळंबे,वैभव नाईक, राजु निलंगेकर, विश्वजित कांबळे,रणजित आंधळे , आशिष लोखंडे,अनिल जायभाये बीडकर यांची उपस्थिती होती. तसेच प्रा. शरद केंद्रे यांचे मोलाचे सहकार्य लाभले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या