💥पुर्णेत भारतीय जनता पार्टीने केला केंद्रीय मंत्री नारायन राणे यांच्या अटकेचा निषेध...!


💥तहसिलदार टेमकर यांना निवेदन देऊन नियमबाह्य पध्दतीने केलेल्या अटकेचा करण्यात आला निषेध💥

पुर्णा (दि.२४ ऑगस्ट २०२१) - पुर्णेत केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या अटकेचा भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज दि.२४ ऑगस्ट २०२१ तीव्र शब्दात निषेध व धिक्कार करण्यात आला.  

भारतीय जनता पार्टीच्या वतीने पूर्णा तहसील कार्यालयात तहसीलदार पल्लवी टेमकर यांना निवेदन देऊन मा.नारायनराव राणे यांच्या नियमबाह्य अटकेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून सरकारच्या वतीने राजकीय हेतूने प्रेरित होऊन सूडबुद्धीने पोलिसांचा राजकीय वापर करून केलेल्या अटकेचा धिक्कार करण्यात आला. तसेच राणे यांच्या वरील दाखल झालेला गुन्हा तात्काळ मागे घेण्यात यावा अन्यथा पक्षाच्यावतीने आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. या निवेदनावर भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कदम, भाजपा तालुकाध्यक्ष अनंतराव पारवे,भाजपा शहराध्यक्ष प्रशांत कापसे,भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष विश्वनाथ होळकर विजय कराड ,बालाजी कदम,वैभव भायेकर,मोहित त्रिवेदी इत्यादींच्या सह्या आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या