💥त्या हल्ल्याचा गंगाखेडात धनगर समाजाकडून निषेध....!


💥सुरेश भुमरे हे नांदेड हुन परभणी ला येत असताना पुर्णे जवळ झाला होता त्यांच्या गाडीवर हल्ला💥

प्रतिनिधी

 धनगर समाजाचे सक्रिय कार्यकर्ते सुरेश भूमरे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा धनगर समाजाच्या वतीने सोमवारी तहसीलदारांना निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला.

 सुरेश भुमरे हे नांदेड हुन परभणी ला येत असताना 28 ऑगस्ट रोजी पूर्णा जवळ गाडीवर रात्री दगडफेक करण्यात आली. सुदैवाने कोणीही जखमी झाले नसले तरी समाजासाठी काम करणाऱ्या माणसावर हल्ला म्हणजे संपूर्ण समाजावर हल्ला असून गंगाखेड तहसीलदार भेट घेऊन निवेदन देण्यात आले. हल्लेखोरांना त्वरित अटक करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. या निवेदनावर सखाराम बोबडे पडेगावकर, शिवाजी महाराज बोबडे, नारायण घनवटे, वैजनाथ भंडारे, जानकीराम वाळवंटे, दत्तराव करवर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या