💥दिल्लीतील नाबालिग बलात्कार हत्या प्रकरणातील आरोपींची संपत्ती जप्त करुन कुटुंबावर गुन्हे दाखल करा - सुमित चावरे


💥वाल्मीकि आर्मीच्या वतीने तहसीलदारांच्या मार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात आले निवेदन💥

पुर्णा ; देशाची राजधानी दिल्ली येथे नाबालिग मुलीवर अमानुषपणे अत्याचार करून आई-वडीलांच्या माघारीच पिडीत मुलीचा मृतदेह जाळून या मानवतेला काळीमा फासणाऱ्या गंभीर घटनेचा नराधम राक्षसी प्रवृत्तीने पुरावा नष्ट करण्याचे निंदणीय कृत्य केले ही घटना भारतीय सभ्यता आणि संस्कृती ला काळीमा फासणारी आहे. 


देशात वारंवार वाल्मिकी समाजाच्या मुलीवर बलात्कारासह हत्येच्या घटना घडत आहेत दिल्लीतीय या मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटनेचा तिव्र निषेध म्हणून पुर्णेत आज शुक्रवार दि.६ आॕगस्ट २०२१ रोजी वाल्मिकी आर्मीच्या वतीने तहसीलदार पल्लवी मेटकर यांच्या मार्फत देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना निवेदन देण्यात आले असून निवेदनात असे नमुद करण्यात आले आहे की वाल्मिकी आर्मी दिल्ली येथील नाबालिक मुलीवर अमानुषपणे बलात्कार करुन करण्यात आलेल्या निर्घण हत्येच्या घटनेचा जाहीर निषेध करीत असून या घटनेतील नराधम राक्षसी प्रवृत्तीच्या आरोपींना जलदगती न्यायालयात घटला चालवून तात्काळ फाशी देण्यात यावी व पिडित कुटुंबला २ करोड रुपयांची आर्थिक मदत व कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्यात यावी अशी मागणी केली असून अश्या गंभीर घटनांतील आरोपींच्या कुटुंबाला जवाबदार धरून त्यांच्यावर सुध्दा गुन्हे दाखल करून त्यांची संपुर्ण संपती जप्त करण्याची कायद्यात तरतूद करण्यात यावी तेव्हाच अशी प्रकरण थांबतील असेही निवेदनात नमूद करण्यात आले असून पुढे निवेदनात असेही नमूद केले आहे की असामाजिक तत्वांकडून स्वतःसह स्वतःच्या कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी वाल्मिकी समाजाला शस्त्र ठेवण्याची परवानगी देण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली असून वाल्मिकी आर्मीने सदरील निवेदन सामाजसेविका सुकेशनी गोधने यांच्या हस्ते दिले यावेळी युवा वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड,बसपाचे भिमराव आवटे, शामु बोलत, दिपक बुरड,आकाश गायकवाड,आकाश घारू‌ इत्यादी मान्यवर उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या