💥पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथील भारतीय स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांकडून दिव्यांग व्यक्तीची मागील दिड वर्षापासून उपेक्षा..!

 


💥दिव्याग युवक सोनकांबळे यांनी बँक प्रशासना विरोधात मुख्य प्रबंधक परभणी यांच्याकडे लेखी स्वरूपात दिली तक्रार💥

ताडकळस : प्रतिनिधी


पुर्णा ; केंद्र शासनासह राज्यशासने दिव्यांगाच्या विकासासाठी विविध शासकीय योजनांसह दिव्यागांच्या संरक्षणासाठी कायदे व विधेयके सभागृहात मंजुर केली आहेत दिव्यांगांना हक्काचे घर,तसेच व्यवसायाच्या दृष्टीकोनातून अनेक दिव्यांग हितकारी योजना अंमलात आणल्या परंतु आजही शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून दिव्यांग व्यक्तीची उपेक्षा केली जात असून त्यांना वेळोवेळी अपमानास्पद वागणूक देवून त्यांचा माणसीक छळ केला जात असल्याचे प्रकिर समोर येत असून असे प्रकार शहरी व ग्रामीण भागातही होतांना दिसत आहेत.असाच काहीसा प्रकार पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथील राष्ट्रीयकृत बँक असलेल्या भारतीय स्टेट बँक शाखेच्या शाखा व्यवस्थापकाकडुन होत असल्याचे समोर आले असून या बँकेत समाजकल्याण जिल्हा परिषद अंतर्गत किराणा दुकानासाठी बिज भांडवल म्हणून कर्जाची फाईल दाखल करून मिळालेल्या कर्जातून स्वयंरोजगार उभा करून स्वाभिमानाने जिवन जगण्याची अपेक्षा ठेवणाऱ्या सचिन सोनकांबळे या दिव्यांग युवकाची मागील दिड वर्षापासून सातत्याने बँकच्या मुजोर व्यवस्थापकांकडून उपेक्षा केली जात असल्याचे गंभीर प्रकार समोर आला आहे.  

भारतीय स्टेट बँके मार्फत किराणा दुकाणासाठी बिज भांडवल म्हणून कर्ज उपलब्ध व्हावे याकरिता दिव्यांग अर्जदार सचिन सोनकांबळे मागील दिड वर्षापासून भारतीय स्टेट बँक ताडकळस शाखेचे शाखाधिकारी  अपंगाच्या कर्जाप्रकरणाची गेल्या दिड वर्षापासुन कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्याने व वेळोवेळी अपमानीत करीत मानसीक छळ केल्याने सदर अपंगावर जिल्हा प्रशासनाच्या दारी आमरण उपोषन करण्याची वेळ आली आहे.

या संदर्भात सविस्तर वृत्त असे की दिव्यांग कर्जअर्जदार सचिन सोनकांबळे हा तालुक्यातील महातपुरी येथिल रहिवाशी असुन तो पायाने ५०% अपंग आहे.अपंगाच्या कोट्यातुन समाजकल्याण विभागा मार्फत बिज भांडवल योजने अंतर्गत एक लाख पंन्नास हजाराची कर्ज प्रकरणाची फाईल भारतीय स्टेट बँक आँफ इंडिया शाखा ताडकळस या बँकेने तो प्रस्ताव दिड वर्षापासुन बँकेने स्वता: कडे ठेवुन ऐनवेळेस गाव दत्तक नसल्याचे कारण सांगुन त्यांच्या कर्ज प्रकरणाची फाईल बँकेने नाकाल्यामुळे त्याच्यासह,त्यांच्या कुटुंबावर अक्षरशः उपासमारीची व नाईलाजाने आत्महत्या करण्याची वेळ बँकेने आणल्या मुळे संपुर्णपणे भारतिय स्टेट बँक आँफ इंडिया शाखा ताडकळस जबाबदार राहणार आहे.कर्जा संदर्भात संबंधित दिव्यांग युवकाचे समाधान करण्याऐवजी उलटपक्षी त्यांना बँकेतील मुजोर व निर्दयी अधिकारी व कर्मचारी बँकेत आलास तर तुझ्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल अशी धमकी देत असल्यामुळे संबंधित दिव्यांग युवक अक्षरशः हतबल झाल्याचे दिसत असून आपणाला न्याय मिळावा याकरिता सचिन सोनकांबळे यांनी भारतीय स्टेट बँकेचे मुख्य प्रबंधक परभणी यांच्याकडे दि.२ आँगस्ट २०२१ रोजी लेखी स्वरुपात तक्रार दाखल केली असून बँकेचे मुख्य महाप्रबंधक या अर्जाची काय दखल घेतात व संबंधित मुजोर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई करतात  याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे....  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या