💥एनओसी अभावी मंगरुळपीर लगतचे पंचशिलनगर,मुर्तीजापुर अजुनही अंधारातच,वांझोटे खंबे ठरत आहेत फक्त शोभेच्या वास्तू...!


💥लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा युवकांनी दिला आहे💥

✍️फुलचंद भगत

वाशिम:-मंगरूळपीर शहरातुन राष्टीय महामार्ग गेला असुन शहरात डिवायडरमध्ये पथदिवे बसवले त्यावर हायमाष्ट एलईडी लाईटही बसवले परंतु एवढ्या दिवसाच्या प्रतिक्षेनंतर मंगरुळपीर नगरपरिषदेने एनओसी दिल्यामुळे तसेच शेलगावच्या ग्रामपंचायतनेही एनओसी दिल्यामुळे मान्यवरांच्या शुभहस्ते १५ गष्ट रोजीच्या पावनपर्वावर  स्र्टिटलाईट सुरु केले असले तरी माञ अजुनपर्यत मंगळसा ग्रामपंचायतने माञ एनओसी न दिल्यामुळे अजुनही पंचशिलनगर (मुर्तीजापुर) ही वस्ती माञ अजुनही अंधारातच असल्याने इथले वांझोटे खंबे खुप महीन्यापासुन शोपिस ठरत आहेत.यैथील ग्रामपंचायतने एनओसी न देन्याचे कारण काही ठिकाणी अर्धवट असलेल्या कामामुळे असल्याचे समजते.पण हे राहीलेले कामे पुर्ण करुन घेण्याची जबाबदारी कुणाची हाही प्रश्न ऊपस्थीत होत असुन पंचशिलनगरला जाणुनबुजुन अंधारात ठेवणार्‍यांना जाब विचारण्यात येइल आणी लवकरच लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा युवकांनी दिला आहे.

प्रतिनीधी-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या