💥पुर्णा तालुका प्रहार जनशक्ती पक्षाच्या तालुकाप्रमुख पदावर शिवहार सोनटक्के यांची निवड...!


💥प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने यांनी नियुक्तीपत्र देऊन केली निवड💥

पुर्णा (दि.१९ ऑगस्ट) - तालुक्यातील कावलगाव सर्कल येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पिंपरन येथील रहिवासी युवा नेते शिवहार सोनटक्के यांची नुकतीच पुर्णा तालुका प्रहार जनशक्ती पक्षाच्या तालुकाप्रमुख पदावर निवड करण्यात आली आहे.


परभणी जिल्हा प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने यांनी शिवहार सोनटक्के यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन राज्याचे राज्यमंत्री तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.मा.ना.बच्चुभाऊ कडू यांच्या आदेशाने त्यांची पुर्णा तालुकाप्रमुख पदावर निवड करण्यात आली असून सदरील नियुक्तीपत्रात असे नमूद केले आहे की आपण दिलेल्या कार्यक्षेत्रामध्ये घराघरामध्ये पोहोचून दिव्यांग,अनाथ,निराधार,शेतकरी,शेतमजूर,गरजुवंतांच्या मदतीसाठी सामाजिक भावनेतून कार्य करावे व पक्षाचे ध्येयधोरण जनसामान्यांपर्यंत पोहोचवावेत असेही नियुक्तीपत्रात म्हटले असून त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे....

*********************************************

💥पुर्णा तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजूर कामगार दिव्यांग निराधारांच्या हक्कासाठी सदैव तत्पर राहिल..!


💥तालुकाप्रमुख शिवहार सोनटक्के यांनी निवडीनंतर दिली प्रतिक्रिया💥

प्रहार जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे राज्यमंत्री आमचे सन्माननीय नेते मा.ना.बच्चुभाऊ कडू व परभणी जिल्हा प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख सन्माननीय शिवलिंग बोधने यांच्या दाखवलेल्या मार्गदर्शनानुसार पक्षाची ध्येयधोरणे राबवत पुर्णा तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजूर कामगार दिव्यांग निराधारांच्या हक्कासाठी लढा देण्यास मी सदैव तत्पर राहणार असून तालुक्यातील प्रत्येक गावात प्रहार जनशक्ती पक्षाची शाखा स्थापणा करण्याच्या दृष्टीने पावल उचणार असल्याचेही नुतन तालुकाप्रमुख सोनटक्के म्हणाले....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या