💥वाशिम स्थानिक गुन्हे शाखेची धाडसी कार्यवाही....!


💥रिसोड येथील रोड रॉबरी गुन्हयाचा छडा लावुन ५ आरोपी अटक, २,१०,०००/-रुपयाचा मुददेमाल हस्तगत💥

✍🏻फुलचंद भगत

वाशिम:-दिनांक १९/०७/२०२१ रोजी फिर्यादी बबन लक्ष्मण सानप वय ४२ वर्ष रा बोरखेडी जिल्हा वाशिम यांनी पोस्टे रिसोड येथे तक्रार नोंदविली की, यातील फी हा नोटरीचे नगदी १,८०,०००रु घेवुन जात असतांना पल्सर गाडीवर अनोळखी ३ इसमांनी पाठलाग करुन शेलु खडसे फाटयावर अडवुन फी चे गाडीचे डिक्की मधील नगदी १,८०,०००रु हिसकावुन घेवुन पळुन गेले वरुन सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला.

              मा. पोलीस अधिक्षक श्री. वसंत परदेशी सो यांनी स्थानिक गुन्हे शाखा वाशिम यांचेकडे वर्ग करुन

सदर गुन्हयाचा तात्काळ छडा लावण्याबाबत आदेशित केले. त्याअनुषंगाने पोलीस निरिक्षक शिवाजी ठाकरे यांनी त्यांचे पथक तयार केले सदर पथकात सपोनि मोहनकर,सपोनि जाधव यांचेकडे जबाबदारी सोपवीली.स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील अधिकारी कर्मचारी यांनी रिसोड शहरातील सी.सी.टी.व्ही फुटेज हस्तगत करुन

गुन्हेगाराने गुन्हा करण्याकरीता वापरलेले वाहनाचा शोध घेतला. नमुद वाहन वाशिम शहरातील गंगु प्लॉट

येथील असल्याची माहिती मिळाल्यावरुन सदर वाहन व वाहन मालक यांना ताब्यात घेऊन गुन्हयासंबंधी विचारपुस केली असता आरोपी नामे १)शेख खाजा मोईनोददीन शेख सलामोददीन राहणार गंगु प्लॉट वाशिम याने त्याचे इतर साथिदार यांचेसोबत मिळुन सदरचा गुन्हा केला असल्याचे मान्य केले.त्यावरुन त्याचे सोबत

गुन्हयात सहभागी असलेले इतर साथिदार यांचा शोध घेऊन २)सचिन दिलीप रसाळ रा निमजगा, ३)गजानन उर्फ चिक्या रामचंद्र पवार यांना ताब्यात घेऊन विचारपुस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा निमजगा येथे रहाणाऱ्या एका महिलेच्या सांगण्यावरुन केला असल्याचे सांगितले. त्यावरुन सदर महिलेस ताब्यात घेऊन विचारपुस केली असता सदर महिलेने आरोपी नामे ५) पंढरी बबन झुंजारे रा बोरखेडी ता रिसोड यांचे सांगण्यावरुन केल्याची कबुली दिली. नमुद आरोपी यांचेकडुन गुन्हयात वापरलेली पल्सर गाडी किंमत ५०,०००/- व नगदी १,६०,०००/- असा एकुण २,१०,०००/- चा मुददेमाल हस्तगत करुन नमुद आरोपीने संगनमत करुन

दरोडा घातल्याचे निष्पन्न झाले.

अशा प्रकारे मा. पोलीस अधिक्षक श्री वसंत परदेशी, अपर पोलीस अधिक्षक श्री विजय कुमार चव्हाण यांचे मार्गदर्शनात दाखल रोड रॉबरी गुन्हयाचा पोलीस निरीक्षक शिवाजी ठाकरे,सपोनि अतुल मोहनकर,

विजय जाधव,अजयकुमार वाढवे, पोना सुनिल पवार,राजेश राठोड,अमोल इंगोले, पोका आश्विन जाधव, राजेश गिरी, निलेश इंगळे, राम नागुलकर, संतोष शेणकुडे, मपोना तहेमिना शेख,सारिका दांडगे, मपोशि रेश्मा ठाकरे,संगिता शिंदे,पुजा पडवाल,चालक संदीप डाखोरे, मिलिंद गायकवाड यांनी तपास करून उलगडा केला आहे. नमुद गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक विजय जाधव स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम हे करीत आहेत.


प्रतिनिधी-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या