💥हाळम येथील सामाजिक कार्यकर्ते माधव मुंडे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती...!💥माधव मुंडे यांच्या निवडीचे जिल्ह्यातून सर्वस्तरांतून स्वागत व अभिनंदनाचा वर्षाव💥

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माधव मुंडे यांची बीड जिल्हा सरचिटणीसपदी  निवड करण्यात आली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख , राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे, जिल्हाध्यक्ष जयसिंग सौळंके यांनी नियुक्ती पत्र देऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. दरम्यान आपल्यावर जो विश्वास टाकला आहे. तो सार्थ करून दाखवू असे प्रतिपादन नवनिर्वाचित जिल्हा सरचिटणीस माधव मुंडे यांनी केले आहे. 

              राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या बीड येथे  आढाव बैठकीत जिल्हा कार्यकारणीची निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये तालुक्यातील सर्व सामान्यांच्या मदतीला धावून येणारे माधव मुंडे यांची जिल्हा सरचिटणीस म्हणून निवड करण्यात आली आहे. मंत्री ना.धनंजय मुंडे यांचे विश्वासतले म्हणून ओळख ,जनसामान्य कार्यकर्ते सोबत घेऊन चालणारे , पक्षनिष्ठा असलेले व  संघटनात्मक वाढीसाठी कठोर परिश्रम घेणारे तसेच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेऊन असामान्य कर्तृत्व निर्माण व सिद्ध करण्याची जी कला प्रत्येकाला अवगत नसते पण ती कला यांनी कमी वेळेमध्ये अवगत केली, सामाजिक, धार्मिक, राजकीय, कार्यामध्ये हिरीरीने सहभाग नोंदवत आपल्या कार्याची चुणूक दाखवून त्यांनी अनेक उपक्रम यशस्वी करून दाखवले आहेत, तसेच हाळम येथे गेल्या 15 वर्षांपासून हाळम फेस्टिव्हलच्या माध्यमातून अशा महत्त्वपूर्ण सामाजिक चळवळ गतिमान करणाऱ्या सर्वधर्मीय कार्यक्रमांमध्ये त्यांनी प्रत्येक वेळी महत्त्वाची भूमिका मांडली आहे, आपलं सामाजिक भान आणि स्वतःचं ज्ञान त्यांनी समाज हितासाठी वापरला आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना काळामध्ये सर्वसामान्य लोकांमध्ये जनजागृती व्हावी व आपण त्यांची काहीतरी मदत केली पाहिजे या उदात्त हेतूने त्यांच्या मदतीसाठी धावून जाणे व सतत मदतीला धावून जाणारं अडचणीमध्ये साथ देणार कुशल संवेदनशील नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. नेहमीच गोर गरीब दिनदुबळ्यांच्या कार्यासाठी कार्य प्रेरणादायी आहे. कुणाच्या कुठल्याही अडचणी सोडवण्यासाठी नेहमीच तत्पर आसता. जिल्ह्यात दांडगा संपर्क आहे. त्यांच्या व्यापक जनसंपर्काची व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे इमानेइतबारे कार्याची दखल घेऊन निवड करण्यात आली आहे. विविध पदांची जबाबदारी सक्षमपणे पारपाडली आहे. विधानसभा निवडणुकीत प्रचारात आघाडीवर योगदान दिले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार जनसामान्यांत पोहचविणेचे काम चांगल्या प्रकारे काम केले आहे. या सर्व कार्याची दखल घेत राष्ट्रवादी युवक काँग्रेसची काम करण्याची संधी दिली आहे. 

          राष्ट्रवादी युवक काँग्रेस व पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी जास्तीत जास्त युवकांचे मोठे संघटन उभारणीसाठी आपण जीवाचे रान करणार तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांच्या पुरोगामी व राष्ट्रवादी विचारांना समाजाच्या तळागाळापर्यंत नेण्याचा आपला संकल्प असल्याचेही ते म्हणाले. तसेच ना.धनंजयजी मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच न.प.गटनेते वाल्मिक आण्णा कराड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातुन पक्ष संघटना मजबुत करण्यासाठी काम करणार असल्याची भावना नवनिर्वाचित बीड जिल्हा सरचिटणीस माधव मुंडे यांनी व्यक्त केली. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे बीड जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या