💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - दिवसभराच्या महत्त्वाच्या बातम्या....!


💥राज्यसभेतील कालच्या अभूतपूर्व गोंधळावरुन राजकीय महाभारत,संसद भवन परिसरात गोंधळाचा निषेध💥

✍️ मोहन चौकेकर 

1. राज्यातील शाळा 17 ऑगस्टपासून सुरु करण्याचा निर्णय तूर्तास लांबणीवर, टास्क फोर्सच्या शिफारसीनंतर राज्य सरकारचा निर्णय, अधिकृत आदेशाची प्रतीक्षा ; शाळा सुरू करण्याच्या निर्णयात सरकारचा सावळा गोंधळ 

2. मुंबई-पुण्यातलं ट्रॅफिक 50 टक्के कमी करणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं व्हिजन ; सध्याच्या कामगिरीवर समाधानी नाही, प्रतिदिन 100 किमीचा महामार्ग बांधण्याचं माझं लक्ष्य, नितीन गडकरी यांचा विश्वास 

3.  राज्यसभेतील कालच्या अभूतपूर्व गोंधळावरुन राजकीय महाभारत, संसद भवन परिसरात गोंधळाचा निषेध 

4. काँग्रेसविरोधात ट्विटरचा कारवाईचा सपाटा; राहुल गांधी यांच्यानंतर पक्षाचे अधिकृत अकाऊंट बंद ; केंद्रीय नेत्यानंतर राज्यातील बाळासाहेब थोरात आणि भाई जगताप या नेत्यांचेही ट्विटर हँडल ट्विटरकडून बंद

5. राज्यातल्या समान विकासासाठी 'नदी जोडो' प्रकल्पावर भर देणार, माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं प्रतिपादन 

6. महाविद्यालयीन तरुणांसाठी जिल्हा स्तरावर 30 टक्के लस राखीव ठेवावी, उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांचा प्रस्ताव, महाविद्यालयीन फी संदर्भातही विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करणार 

7.  हिमाचलमध्ये महाराष्ट्रातील तळीयेची पुनरावृत्ती, प्रवाशांनी भरलेल्या बसवर दरड कोसळली, आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू 

8. कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही, देशात गेल्या 24 तासांत 40 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद ; राज्यात बुधवारी 5560 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर रिकव्हरी रेट 96.82 टक्के 

9. अमरावतीच्या पिस्तुल घेऊन व्हिडीओ काढणाऱ्या पोलिसाचं निलंबन रद्द, परिसरात लागले शुभेच्छांचे बॅनर 

10. भारत विरुद्ध इंग्लंड आजपासून दुसरी कसोटी, पावसामुळे खेळ थांबला, भारताची धावसंख्या 46/0, सामन्यापूर्वी इंग्लंडला दोन मोठे धक्के, दिग्गज खेळाडू बाहेर 

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या