💥नाशिक येथील लाचखोर प्रकरणी शिक्षणाधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात...!


💥एका संस्थेकडून ८ लाखांची लाच घेताना रंगेहाथ अटक💥

नाशिक : शाळांना मंजूर करण्यात आलेल्या २० टक्के अनुदानाप्रमाणे नियमित वेतन सुरू करण्याचा कार्यादेश काढून देण्याच्या मोबदल्यात एका संस्थेकडून ८ लाख रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी एका महिला शिक्षणाधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर वीर यांच्यासह शासकीय वाहनचालक आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या एका शिक्षकाला ताब्यात घेतलं आहे ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं ही कारवाई केली आहे.

शासनाने मंजूर केलेल्या दोन शिक्षणसंस्थांच्या शाळांच्या वीस टक्के अनुदानानुसार नियमित वेतन सुरू करण्याकरिता झनकर यांनी कार्यादेश काढण्यासाठी ९ लाख रुपयांची मागणी केली होती पण तडजोडीनंतर आठ लाख रुपये देण्याचं ठरलं होतं यानंतर संबंधित संस्थाचालकानं याची तक्रार थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली. लाचलुचपत विभागानं तक्रारीची शाहनिशा केल्यानंतर सापळा रचून आरोपी शिक्षणाधिकाऱ्याच्या हस्तकाला अटक केली आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या