💥मालेगाव तालुक्यातील ढोरखेड्यात होणार आदर्श सरपंच पेरे पाटील यांचे मार्गदर्शन...!


💥कार्यक्रमाला बहुसंख्य नागरिकांनी व सरपंचांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा - सरपंच सौ सुनीता बबनराव मिटकरी

✍🏻दिलीप शिंदे

मालेगाव :- तालुक्यातील स्मार्ट ग्राम ढोरखेडा येथे महाराष्ट्रातील आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचे मार्गदर्शन 30 ऑगस्ट रोजी  सकाळी 9 वाजता  होणार आहे तरी या कार्यक्रमाला बहुसंख्य नागरिकांनी व सरपंचांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन येथील सरपंच सौ सुनीता बबनराव मिटकरी यांनी केले आहे.

            आपल्या कार्यशैलीने प्रसिद्ध असणारे आणि आपल्या गावाचा नावलौकिक पूर्ण भारतभर पसरवणारे भास्कर पेरे पाटील यांचे मार्गदर्शन तालुक्यातील स्मार्ट ग्राम बोरखेडा येथे ठेवण्यात आली आहे जेणेकरून आपल्या तालुक्यातील सरपंचांना सुद्धा योग्य मार्गदर्शन मिळावे यामुळे या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आल्याची माहिती बबनराव मिटकरी यांनी दिली आहे त्या कार्यक्रमाला उदघाटक म्हणून माजी जी प अद्यक्ष चंद्रकांत ठाकरे हे राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून जी प अध्यक्ष  शाम गाभने दिलीप जाधव शोभाताई गोंडाळ बेबीताई इंगोले  गटविकास अधिकारी कांबळे मोहन वानखेडे हे उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमाला बहुसंख्य नागरिकांनी व सरपंचांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन येथील सरपंच सौ सुनीता बबनराव मिटकरी यांनी केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या