💥पुर्णेतील बुद्ध विहारात श्रावण पौर्णिमा निमित्त धम्मदेशना व सत्कार समारंभ......!


💥भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो,भंते पया वंश, संघरत्न,श्रामनेर संघ यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 22 ऑगस्टला आयोजन💥

पूर्णा (दि.21ऑगस्ट) - श्रावण पौर्णिमे निमित्त येथील बुद्ध विहार या ठिकानी धम्मदेसना व सत्कार समारंभाचे आयोजन भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो,भंते पया वंश, संघरत्न,श्रामनेर संघ यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 22 ऑगस्ट ला करण्यात आले आहे.

सकाळी साडेपाच वाजता  परित्राण पाठ व सूत्रपाठ भिक्खू संघाच्या वतीने करण्यात येईल दुपारी साडेबारा वाजता सामूहिक बुद्ध वंदना पूजा विधि व सत्कार समारंभ आयोजित केला आहे. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती परभणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राजेश विटेकर उपाध्यक्ष अजय चौधरी समाज कल्याण सभापती रामराव उबाळे, नांदेड येथील डॉक्टर नितीन पाईकराव, महाराष्ट्र बँकेचे कॅशियर भारत अमराव, गौर या गावचे चे सरपंच आनंद पारवे यांची उपस्थिती असणार आहे.

भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो भदंत पैया वंश यांची धम्मदेशना याप्रसंगी होणार आहे कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन बुद्ध विहार समिती पूर्णा, भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पूर्णा,व धम्म सेवेमध्ये कार्यरत असलेल्या निरंजना धम्मा सेवाभावी महिला मंडळ, रोहिणी धम्मा सेवाभावी महिला मंडळ , आम्रपाली महिला मंडळ, विशाखा महिला मंडळ, तक्षशिला महिला मंडळ, माता रमाई महिला मंडळ यांनी केले आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या