💥बॉलिवूडचे शहंनशाह अमिताभ बच्चन यांची लक्झरी कार जप्त....!


💥सलमान खान चालवत होता गाडी ; कर्नाटक परिवहन विभागाने एक रोल्स-रॉयस फँटम गाडी जप्त केली💥

 बॉलिवूडचे शहंनशाह बिग बी अमिताभ बच्चन यांच्या एका लक्झरी कारवर बंगळूरु पोलिसांनी कारवाई केली आहे कर्नाटक परिवहन विभागाने एक रोल्स-रॉयस फँटम गाडी जप्त केली असून ही लक्झरी कार बिग बी अमिताभ बच्चन यांच्या नावावर रिजिस्टर आहे तर कार चालवणाऱ्या व्यक्तीचं नाव सलमान खान असल्याने चर्चांना उधाण आलं गाडी चालवणाऱ्या व्यक्तीची ओळख सलमान खान अशी असून ही व्यक्ती वसंतनगरची रहिवासी आहे. 

त्यांच्या वडिलांनी बच्चन यांच्याकडून ही कार खरेदी केल्याची माहिती अतिरिक्त परिवहन आयुक्त एल. एल. नरेंद्र होळकर यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे सुत्र्यांच्या माहितीनुसार निर्माते विधु विनोद चोप्रा यांनी बिग बींना ही कार भेट म्हणून दिली होती २००७ सालामध्ये आलेल्या ‘एकलव्य’ या सिनेमच्या यशानंतर त्यांनी बिग बींना ही कार भेट केली होती २०१९ मध्ये उमरा डेव्हलपर्सच्या युसूफ शरीफ उर्फ ​​डी. बाबू यांना बिग बींनी ही कार विकली होती. 

मात्र कारचे व्यवहार झाल्यानंतरही या कारची मालकी बिग बी यांच्या नावावरच असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं दरम्यान ‘वाहन’ या ऑनलाईन पोर्टलवर या गाडीची माहिती उपलब्ध नसल्याचंही कारवाईत समोर आलं बाबू यांनी ही लक्झरी कार बिग बी यांच्याकडू खरेदी केल्याचं स्पष्ट केलं आहे ते म्हणाले “माझे कुटुंबिय कधीतरी या गाडीचा वापर करतात त्यांनी या गाडीसह इतर लक्झरी गाड्या ताब्यात घेतल्या वाहनाची कागदपत्रे सादर केल्यानंतर मला माझ्या गाड्या पुन्हा मिळतील असं सांगण्यात आलंय ही कार अजूनही बच्चन यांच्या नावावर आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या