💥शिक्षणाची प्रत्यक्ष जीवनाशी सांगड हवी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांचे प्रतिपादन.....!


💥सेलूच्या नूतन महाविद्यालयाला 'वन डिस्ट्रिक्ट वन ग्रीन चॅम्पियन' पुरस्कार प्रदान💥

परभणी/सेलू : समाजात स्वच्छता व पर्यावरण विषयक जनजागृती करित शिक्षणाला केवळ वर्गापुरते मर्यादित न ठेवता, शिक्षणाची विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष जीवनाशी सांगड घालता आली पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी बुधवार ११ ऑगस्ट रोजी केले.

परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी दीड वाजता आयोजित कार्यक्रमात जिल्ह्यातील सेलू येथील नूतन महाविद्यालयाला पर्यावरण विषयक उल्लेखनीय कार्याबद्दल केंद्र सरकारच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण शिक्षा परिषद, शिक्षण मंत्रालय भारत सरकार व मानव विकास संसाधन मंत्रालयाचा 'वन डिस्ट्रिक्ट वन ग्रीन चॅम्पियन'  पुरस्कार जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, डॉ. निर्मला पद्मावत यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ.संजय हरबडे, पर्यवेक्षक प्रा.नागेश कान्हेकर, प्रा.महेश कुलकर्णी,प्रा अजय उंडेगावकर आदींची उपस्थिती होती.

मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयांनी अभ्यासपूरक आणि अभ्यासेत्तर उपक्रम राबविण्यावर अधिक भर द्यावा, असे नमूद करून ग्रामीण भागात काम करतांना शिक्षण संस्थांना आणि शिक्षकांना खूप अडचणी येत असतात. पण मेहनत, संशोधन आणि नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने त्यावर मात करून भारताला विकासाच्या दिशेने नेता येईल. या अनुषंगाने शैक्षणिक संस्थानी विद्यार्थ्यांना योग्य दिशा दाखवावी, असे श्रीमती गोयल यांनी सांगितले. परभणीला रुजू झाल्यापासून पहिलाच कार्यक्रम आहे, असेही त्या म्हणाल्या. 

ऑनलाईन आयोजित या कार्यक्रमाला नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया, सचिव डी.के. देशपांडे, सहसचिव डॉ.व्ही.के.कोठेकर, जयप्रकाश बिहाणी योगिता मांडोळे, जयश्री जानी,अमोल डंबाळे, रवी ढबाळे आदींसह विद्यार्थी, पालकांची उपस्थिती होती.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या