💥पुर्णा तालुक्यातल्या सुहागण येथे छत्रपती संभाजी विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न...!


💥या सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष हिराजी भोसले हे होते💥 

पूर्णा (दि.११ ऑगस्ट २०२१) - तालुक्यातील सुहागन येथील छत्रपती संभाजी विद्यालयात काल मंगळवार दि.१० ऑगस्ट २०२१ रोजी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते या सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष हिराजी भोसले हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ नवनाथ लोखंडे प्राचार्य डॉ संतोष कुरे हे होते तर व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष बळीरामजी भोसले केंद्रप्रमुख प्रभू भोसले उपजिल्हाप्रमुख दशरथ भोसले संचालक धोंडीराम भोसले ग्रामपंचायत सदस्य माऊली भोसले बालाजी भोसले गुणाजी भोसले शाळेचे मुख्याध्यापक एम जी कल्याणकर जनार्दन भोसले सोपान ढोणे हे उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ.नवनाथ लोखंडे यांनी   सांगितले की विद्यार्थी हा सर्वगुणसंपन्न विद्यार्थी असला पाहिजे ग्रामीण भागातील असल्यामुळे बौद्धिक ज्ञानाबरोबर कृषीचे अनुभव ज्ञान असले पाहिजे तसेच खेळांमध्ये अधिकाधिक प्रमाणात सहभागी होऊन आरोग्य संपन्न जीवन जगले पाहिजे शेतीला  महत्त्व दिले पाहिजे आई वडिलांचे नाव गावामध्ये अभिमानाने दुसऱ्याने घ्यावे असे कार्य केले पाहिजे असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जी एस वाघमारे यांनी केले तर आभार प्रदर्शन बि ई दहिफळे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जी  एस भागवत दौलत भोसले हि पी सावंत शिवाजी सारंग विठ्ठल सारंग गणेश गायकर संदेश आरबाड काता जाधव अश्विनी भोसले तुकाराम लहाने गंगाधर भोसले गोविंद मोरवले डिगामबर भालेराव आदीने सहकार्य केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या