💥मुंबई-सिकंद्राबाद देवगिरी एक्सप्रेसने नुतन जिल्हाधिकारी आंचल गोयल आज परभणीत दाखल...!


💥जिल्हाधिकारी आंचल गोयल यांचे मंडळ अधिकारी व तलाठी या दोघांनी शिष्टाचाराप्रमाणे रेल्वे स्थानकावर केले स्वागत💥 

परभणी (दि.५ आॕगस्ट २०२१) - परभणी जिल्ह्याच्या नूतन जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल या आज गुरुवार दि.५ आॕगस्ट २०२१ रोजी सकाळी मुंबई-सिकंद्राबाद देवगिरी एक्सप्रेसने मुंबईहून परभणीत दाखल झाल्या असून यावेळी त्यांचे मंडळ अधिकारी व तलाठी या दोघांनी शिष्टाचाराप्रमाणे त्याचे रेल्वे स्थानकावर उपस्थित राहून स्वागत केले.

श्रीमती गोयल यांनी आपल्या स्वागतास कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याने, कर्मचाऱ्यांने रेल्वेस्थानकावर येऊ नये अशा स्पष्ट सूचना दिल्या होत्या. त्यामुळेच त्यांच्या सुचनांचे पालन करुन महसूल खात्यातील वरिष्ठांनी रेल्वेस्थानक गाठले नाही...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या