💥पालखी मार्गाचे भूसंपादन तीन महिन्यांत पूर्ण करा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिले आदेश...!



💥पुण्यातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या बैठकीत केंद्रीय भूपृष्ठमंत्री गडकरी यांनी दिले आदेश💥

पुणे : पालखी मार्गाचे भूसंपादन येत्या तीन महिन्यांत पूर्ण करण्याचा आदेश केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांनी जिल्हा प्रशासनाला दिला तसेच जे ठेकेदार चुकीच्या पद्धतीने रस्त्याची कामे करून नागरिकांना वेठीस धरतात अशांना तातडीने काळ्या यादीत टाकण्याचे आदेशही त्यांनी अधिकाऱ्यांना या वेळी दिले पुण्यातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या बैठकीत केंद्रीय भूपृष्ठमंत्री गडकरी यांनी हे आदेश दिले. 

पुण्यातून सुरू होणाऱ्या दोन्ही पालखी मार्गांचा आढावा घेऊन तातडीने काम मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी दिल्या तसेच पुण्यात राष्ट्रीय महामार्गाची सुरू असलेल्या कामांत जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने आवश्यक जागा प्राधिकरणाकडे वर्ग कराव्यात काही ठेकेदार चुकीच्या पद्धतीने रस्त्यांचे आरेखन करत असतात, त्यामुळे नागरिकांना त्रास होतो अशा ठेके दारांवर कडक कारवाई करावी केंद्राने राष्ट्रीय महामार्ग विकासाला विशेष प्राधान्य दिले आहे. 

पुणे-सातारा महामार्ग, पुणे-नाशिक महामार्ग, दोन्ही पालखी मार्ग, चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे काम तत्काळ मार्गी लावावे, असे आदेश गडकरी यांनी या वेळी दिले दरम्यान, पालखी मार्गातील पुणे जिल्ह्यातील झेंडेवाडी, पवारवाडी, दिवे आणि जेजुरी येथील भूसंपादन होणे बाकी आहे जेजुरी गावातून हा मार्ग न्यायचा, की बाह्यवळण मार्ग करायचा याबाबत निर्णय विलंबाने घेतल्याने भूसंपादन बाकी असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून गडकरी यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. 

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे नॅशनल हायवेज अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया – एन.एच.ए.आय.अधिकारी या वेळी उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या