💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - दिवसभराच्या महत्त्वाच्या बातम्या...!


💥दिल्ली : राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी घेतली अमित शाहांची भेट; राजकीय चर्चांना उधाण💥

 ✍️ मोहन चौकेकर 

1 ) राज्यातील ७८ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना पदक जाहीर; मुख्यमंत्र्यांकडून विशेष अभिनंदन पोलीस शौर्य, राष्ट्रपती पोलीस पदक, अग्निशमन शौर्य पदक विजेत्यांचा समावेश; केंद्रीय गृहमंत्रालयाने केली घोषणा

2 ) भारतात गेल्या २४ तासांत ३८ हजार नव्या रुग्णांची नोंद; पॉझिटिव्हिटी रेट २.०५ टक्क्यांवर देशात सध्याच्या घडीला ३ लाख ८७ हजार ६७३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत

3 ) राज्यात डेल्टा प्लसचे 66 रुग्ण, पाच जणांचा मृत्यू, कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या 10 रुग्णांनाही लागण; आरोग्य मंत्री राजेश टोपे

4 ) उद्यापासून राज्यातील मॉल्स, शॉपिंग सेंटर रात्री 10 पर्यत खुली ; मॉल, शॉपिंग सेंटरमध्ये प्रवेशासाठी घातलेल्या लसीकरणाच्या अटीला दुकान मालकांकडून कडाडून विरोध

5 ) महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्गाच्या कामात स्थानिक खासदार आणि शिवसैनिकांकडून अडचणी आपण लक्ष घालावं; नितीन गडकरी यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र.

​6) भारत बायोटेकच्या नाकाद्वारे द्यायच्या लसीला दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलसाठी मंजुरी; पहिल्या टप्प्यातील चाचणीचे निष्कर्ष सकारात्मक.

7 )“ नरेंद्र मोदी काही भारताचे राजे नाहीत”; ‘तुम्ही Anti Modi आहात’ असं म्हणणाऱ्याला भाजपा खासदाराने सुनावलं

8 ) दिल्ली : राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी घेतली अमित शाहांची भेट; राजकीय चर्चांना उधाण ; उच्च न्यायालयाने विधान परिषदेवरील राज्यपाल नामनिर्देशित १२ सदस्यांच्या नियुक्तीबाबत राज्यपालांना सल्ला दिला त्या दिवशीच ही भेट झाली

9 ) “सत्यमेव जयते,” ट्विटरने अकाऊंट अनलॉक करताच काँग्रेसकडून ट्विट ; राष्ट्रीय बालहक्क आयोगाने ट्विटरला नोटीस बजावल्यानंतर राहुल गांधींचे ट्विटर खातं ६ ऑगस्टला बंद करण्यात आलं होतं

10)  कल्याण : नाकाबंदीमध्ये बाइक थांबवली म्हणून तरुणाने पोलीस कर्मचाऱ्याला दगडाने हल्ला करुन केलं जखमी;कल्याण पश्चिमेकडील शहाड पुलाजवळ पोलिसांनी नाकाबंदी सुरु आहे. शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा प्रकार घडला

11)  तुमच्या मागे ईडी, सीबीआयची चौकशी लावू; मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकरांना धमकी ; व्हॉट्सअप मेसेज पाठवून मिलिंद नार्वेकर यांना धमकी देण्यात आली आहे

12 ) विमान प्रवास महागणार; सरकारनं तिकीट दरात नऊ ते १२ टक्क्यांपर्यंत केली वाढ सरकारने केवळ दोन महिन्यांतच दुसऱ्यांदा देशांतर्गत विमान तिकीटांच्या किमती ९ ते १२ टक्क्यांनी वाढवल्या आहेत

13 ) करोनाविरोधातील लढाईत दिलासा देणारी बातमी; लसीच्या दुसऱ्या डोसनंतर संक्रमणांचे प्रमाण कमी भारतात लस घेतलेल्या एकूण २.६ लाख लोकांना करोनाची लागण झाली आहे

14 ) UAE मध्ये रोहितच्या ‘मुंबई इंडियन्स’ला मिळाली ‘ती’ खास सुविधा; धोनीचा संघ मात्र मुकला ; स्थगित करण्यात आलेलं आयपीएलचं १४ वं पर्व आता १९ सप्टेंबरपासून दुबईमध्ये सुरु होणार आहे. या पर्वाची सुरुवात मुंबई विरुद्ध चेन्नई सामन्याने होणार आहे

15 )  सचिन तेंडुलकरने ३१ वर्षापूर्वी केला होता विक्रम; व्हिडिओ शेअर करत जागवल्या आठवणी ; सचिन तेंडुलकरच्या चाहत्यांसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आजच्या दिवशी म्हणजे १४ ऑगस्ट १९९० साली सचिननं कसोटी शतक झळकावलं होतं...

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या