💥कोरोना महामारीने तीन पिढ्यांचे नुकसान अनेक आप्तेष्ट गमावले - धनंजय मुंडे यांनी केले परळीतील विविध कुटुंबियांचे सांत्वन...!


💥शहरातील विविध मृत व्यक्तींच्या कुटुंबियांचे ना. धनंजय मुंडे यांनी त्यांच्या घरी भेटी देऊन सांत्वन केले💥

परळी : कोरोना महामारीच्या काळात परळीतील तीन पिढ्यांतील अनेक जण जवळचे हे जग सोडून गेले. परळीतील माझ्या परिवारातील सदस्यांसारखे अनेक आप्तेष्ट गमावले याचे दुःख आहे, असे धनंजय मुंडे यांनी परळीत म्हटले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत परळी शहरातील विविध मृत व्यक्तींच्या कुटुंबियांचे ना. धनंजय मुंडे यांनी त्यांच्या घरी भेटी देऊन सांत्वन केले. 

परळी शहरातील धनंजय मुंडे यांचे लहानपणीचे मित्र बाबूभाई नंबरदार यांच्यासह महेश रुद्रवार, श्रीमती चंद्रकांता नंदकिशोर जाजू, प्रशांत वांगकर, प्रवीण उपाध्याय, भरत कुलकर्णी, वैजनाथ दहातोंडे, सोमनाथअप्पा निलंगे, विजय कुचेरीया, अविनाश जाधव, जगदीश सारडा, गोल्डी शेठ भाटिया, किशोर व्यवहारे, सचिन सारडा आदी कुटुंबांना यावेळी धनंजय मुंडे यांनी त्यांच्या घरी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले.

यावेळी ना. मुंडे यांच्यासह न.प. गटनेते वाल्मिक अण्णा कराड, बाजीराव भैय्या धर्माधिकारी, दीपक नाना देशमुख, सूर्यभान नाना मुंडे, चंदूलाल बियाणी, सुरेश टाक, विजय भोईटे, सुरेश नानवटे यांच्यासह शहरातील पदाधिकारी उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या