💥लोणावळा रेल्वे सामान्यांसाठी कधी ? असा प्रश्न प्रवाशांकडून केला जात आहे...!


💥मुंबई उपनगरीय रेल्वेच्या धर्तीवर प्रवाशांकडून मागणीला जोर💥

पुणे : करोना काळामुळे सुमारे दीड वर्षांहून अधिक काळ सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद असलेली पुणे-लोणावळ उपनगरीय रेल्वे सेवा पुन्हा कधी सुरू होणार ? असा प्रश्न प्रवाशांकडून केला जात आहे लशींच्या दोन मात्रा घेतलेल्यांना १५ ऑगस्टपासून मुंबईत उपनगरीय रेल्वेतून प्रवासाला परवानगी देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्यानंतर पुणे-लोणावळा आणि पुणे-दौंड मार्गावरील सेवाही पुन्हा सुरू करण्याच्या मागणीला जोर आला आहे. 

करोनाच्या पहिल्या लाटेमध्ये संसर्ग वाढीस लागल्यानंतर तातडीने पुणे-लोणावळा उपनगरीय सेवा बंद करण्यात आली होती टाळेबंदी शिथिल करण्यात आल्यानंतर केवळ २० टक्के फेऱ्या सुरू करून त्यात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवासाची मुभा देण्यात आली आहे त्यानंतर अद्यापही सर्वसामान्य प्रवाशांना या सेवेला लाभ मिळालेला नाही रेल्वेकडून लांब पल्ल्याच्या इतर गाडय़ा सर्वासाठी सुरू करण्यात आल्या असल्या तरी उपनगरीय वाहतुकीबाबत रेल्वेकडून राज्य शासनाच्या आदेशाकडे बोट दाखविले जात आहे. 

त्यानुसार राज्य शासनाने मुंबईबाबत निर्णय घेतला आहे त्यामुळे पुणे-लोणावळा उपनगरीय वाहतुकीसह पुणे-दौंड, पुणे-बारामती आदी मार्गावरील उपनगरीय सेवा सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे टाळेबंदीपूर्वी पुणे-लोणावला उपनगरीय रेल्वेच्या चाळीसहून अधिक फेऱ्या होत होत्या विद्यार्थी, कामगार, व्यापारी आदी वर्गासाठी ही सेवा अत्यंत महत्त्वाची आहे दररोज सुमारे एक लाख प्रवासी या सेवेचा लाभ घेत होते सध्या पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांतील र्निबधात शिथिलता देण्यात आली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या