💥“हजारो चिखलीकरच्या उपस्थितीत शहीद कैलास पवार अनंतात विलिन चिखलीत उसळला शोकसागर...!


💥अंत्यत दुखद वातावरणात दुपारी २ वाजता कैलास पवार यांना त्यांचे वडील आणि भाऊ यांनी मुखाग्नी दिला💥

 ✍️ मोहन चौकेकर 

चिखली : सियाचीन ग्लेशियर येथे खडा पहारा देणारा चिखली  शहरातील कैलास पवार हा जवान १ ऑगस्टला कर्तव्य बजावत असतांना शहीद झाला.आज दि.४ ऑगस्टला सकाळी औरंगाबाद येथून त्यांचे पार्थिव येत असतांना ठिकठिकाणी त्यांना नागरिकांनी पुष्पवृष्टी करीत श्रद्धांजली अर्पण केली.चिखली येथील गजानन नगर भागात त्यांच्या राहत्या घरी त्यांचे अंत्यदर्शनासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.दुपारी ११ वाजता त्यांची अंत्ययात्रेला सुरवात झाली उपस्थितीतांनी कैलास पवार अमर रहे चे नारे देत भारत माता की जय च्या घोषणा दिल्या.शहरातील प्रमुख मार्गाने निघालेली अंत्ययात्रेत हजारोंच्या संख्येने नागरिक चालत होते.तालुका क्रिडा संकुलच्या भव्य मैदानात कैलास पवार यांना उपस्थितीतांनी मानवंदना दिली.पोलीस विभाग आणि भारतीय सेनेच्या वतीने हवेत तिन फैरी झाडुन सलामी दिली.अंत्यत दुखद वातावरणात दुपारी २ वाजता कैलास पवार यांना त्यांचे वडील आणि भाऊ यांनी मुखाग्नी दिला.


चिखली येथील गजानन नगर भागात रहाणारे कैलास पवार हे २०१६/१७ ला भारतीय सैन्यात दाखल झाले होते. अंत्यत कठोर प्रशिक्षण घेऊन त्यांनी कर्तव्य बजवण्यासाठी तयार झाले होते.शालेय जीवनापासुनच देशसेवेची आवड असल्याने कैलास ने एनसीसी मध्ये दाखल होउन तयारीला सुरवात केली होती.भारत पवार यांना दोन मुले आणि एक मुलगी असे कुटुंब होते यामध्ये कैलास मोठा असल्याने आपण आपल्या आई वडिलांचे नाव मोठे करुन देशाची सेवा करण्याचा जनु चंगच बांधला होता.त्यानुसार सैन्यात दाखल झाल्यावर घरची परिस्थिती बेताची असल्याने घरात कर्ता पुरुष म्हणुन वडिलांना काळजी करु नका असे सांगत घर बांधण्याचे स्वप्न बघत होता तसेच घरी आल्यानंतर एकुलत्या बहिणीच्या वाढदिवसाला गाडी गिफ्ट  करणार असल्याचे देखील बहिणीला शब्द दिला होता सियाचीन ग्लेशियरमध्ये १ वर्ष सेवा देऊन घरी परतण्याचे वेध लागलेल्या कैलासचा काळाने वेध घेतला आणि मनाशी असलेले स्वप्न तसेच रहाले.


वयाच्या १९ व्या वर्षी सैन्यात दाखल झालेल्या कैलासचे आता लग्नाचे वय झाल्याने आई वडील त्याच्या लग्नाचे विषय घरी बोलत होते कैलास सहा महिन्याच्या सुट्टीवर येणार म्हंटल्यावर घरी आनंदाचे वातावरण होते आई देखील सुनेचे सुख मिळणार  या कल्पनेने भारावली होती काही स्थळ पहाले देखील होते परंतु ही माऊली मात्र कैलासची विरमाता झाली आणि त्याच्या पार्थिवावरील तिरंगा स्विकारण्याचा मान मिळाला.यावेळी दुखद प्रसंगी देखील कैलास पवार यांच्या आई वडिलांना देखील आपल्या मुलाच्या देशसवेवर गर्व करीत होते. दि.१ ऑगस्टला शहीद झालेल्या कैलासच्या आईच्या डोळ्याती अश्रू मात्र थांबता थांबत नव्हते.पालकमंत्री,जिल्हाधिकारी,जिल्हा पोलीस अधीक्षक, खासदार आमदार यांनी पुष्पचक्र अर्पण केले.लष्कराकडून कैलास यांच्या परिवाराला ध्वज प्रदान करण्यात आला.     

याप्रसंगी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी शासनाच्या वतीने आपल्या संवेदना प्रकट केल्या. तर आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनीही आपली संवेदना प्रकट केली.    यावेळी उपस्थित चिखलीकर शोकसागरात बुडाले कैलास यांना शेवटचा निरोप देतांना आभाळाचेही डोळे दाटून आले होते. यावेळी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे,जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती,जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया,खासदार प्रतापराव जाधव, आमदार श्वेताताई महाले,आमदार संजय गायकवाड,आमदार संजय रायमूलकर,नगराध्यक्षा प्रिया बोन्द्रे,रविकांत तुपकर, माजी आमदार राहुल बोंद्रे , शशिकांत खेडेकर, रविकांत तुपकर, पंचायत समिती सभापती सिंधुताई तायडे, नगराध्यक्ष प्रियाताई बोन्द्रे, उपाध्यक्ष वजीराबी शेख अनिस, उपविभागीय अधिकारी हांडे, तहसीलदार अजित  येळे,  जिल्हा सैनिक अधिकारी पडघान, जिल्हा परिषद सदस्य जयश्री शेळके, ज्योती ताई पडघान, नगर परिषद मुख्याधिकारी अभिजित वायकोस, कर्नल विनोद गवई, यांच्यासह राजकीय सामजिक, सहकार, शैक्षणिक क्षेत्रातील, व्यापारी, पत्रकार, नगर परिषद सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, तहसील, नगर परिषद, पोलीस कर्मचारी, गावातील प्रतिष्ठित नागरिक व परिसरातील नागरिक, महंत भन्ते, मोठ्या संख्येने उपस्थित होते.....

 ✍️  मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या