💥राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात यवतमाळात तक्रार....!


💥दसरा मेळाव्यात योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात भाष्य केल्याचा भाजपा जिल्हाध्यक्षांचा आरोप💥

यवतमाळ : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मंगळवारी राज्यामध्ये राणेंची अटक आणि रात्री उशिरा सुटका असे राजकीय नाट्य पहायला मिळाले या प्रकरणावरून राज्यात जागोजागी शिवसैनिक आणि भारतीय जनता पार्टी समर्थक आमने-सामने आले आहेत.

अशातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांविरोधात केलेल्या वक्त्याव्याप्रकरणी भा.ज.पा. यवतमाळ जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून यवतमाळ जिल्ह्यात पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. 

उमरखेड, यवतमाळ, महागाव, पुसदसहित एकूण पाच ठिकाणी तक्रारी दाखल करण्यात येत असल्याचे भुतडा यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले ‘योगी आदित्यनाथ यांना चपलांनी मारलं पाहिजे ते योगी आहेत त्यांनी कुठंतरी जाऊन बसावं त्यांनी कशाला मुख्यमंत्री होऊन राजकारण करावं’ असं मुख्यमंत्र्यांनी दसरा मेळाव्यातील भाषणामध्ये म्हटल्याचा व्हिडीओ. आपण पाहिला आणि त्यानंतर तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला. 

तसेच जिल्हाध्यक्ष या नात्याने जिल्ह्यातील इतर भाजपा कार्यकर्त्यांनाही मुख्यमंत्र्यांविरोधात पोलीस ठाण्यांत तक्रारी दाखल करण्यास सांगितले आहे असे भुतडा म्हणाले राणे जे बोलले त्यापेक्षा उग्र स्वरूपाची ठाकरे यांची भाषा होती ज्या कलमांतर्गत राणेंविरोधात तक्रारी दाखल केल्या त्याच कलमांतर्गत मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रारी दाखल केल्या पाहिजेत अशी आमची मागणी आहे असे ते म्हणाले फिर्याद दाखल केल्यानंतर केंद्रीय मंत्र्यांविरोधात तत्परतेने गुन्हे दाखल केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या