💥ऐतिहासिक ; युएनएससीचं अध्यक्षपद भूषवणारे पहिले भारतीय पंतप्रधान ठरणार नरेंद्र मोदी....!


💥७५ वर्षांत प्रथमच संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची बैठक भारतीय पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली होणार💥                                  

✍️ मोहन चौकेकर 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची बैठक होणार आहे. ७५ वर्षांत प्रथमच संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची बैठक भारतीय पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली होत असल्याची माहिती संयुक्त राष्ट्रातील भारताचे माजी राजदूत सय्यद अकबरुद्दीन यांनी दिली. भारत आज संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचा अध्यक्ष झाला आहे.

ऑगस्ट २०२१ मध्ये संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचं अध्यक्षपद भारताकडे असेल. या कालावधीत एक उच्चस्तरीय बैठक घेतली जाणार असून त्यामध्ये सागरी सुरक्षा, दहशतवाद आणि शांतता प्रस्थापित करण्यासंदर्भात चर्चा करण्यात येईल अशी माहिती संयुक्त राष्ट्रातील भारताचे प्रतिनिधी टी. एस. तिरुमूर्ती यांनी दिली. '७५ वर्षांत प्रथमच भारतीय नेतृत्त्वानं संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या कोणत्याही कार्यक्रमाचं अध्यक्षपद भूषवण्यात रस दाखवला,' असं अकबरुद्दीन म्हणाले.

संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत १५ देश आहेत. यापैकी ५ स्थायी आणि १० अस्थायी सदस्य आहेत. स्थायी देशांमध्ये चीन, फ्रान्स, रशिया, ब्रिटन आणि अमेरिकेचा समावेश आहे. भारत परिषदेचा अस्थायी सदस्य आहे. अस्थायी सदस्य म्हणून भारताला २ वर्षांचा कालावधी मिळाला आहे. १ जानेवारी २०२१ पासून या कालावधीची सुरुवात झाली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (यूएनएससी) बैठकीचे अध्यक्षपदी विराजमान होणार आहेत. असं करणारे ते देशाचे पहिलेच पंतप्रधान असतील असं संयुक्त राष्ट्रातील भारताचे माजी स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरूद्दीन यांनी सांगितलं आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील भारताचा हा आठवा कार्यकाळ असून या बैठकीचे अध्यक्षपद स्वीकारण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला आहे. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची बैठक संपूर्ण ऑगस्ट महिन्यापर्यंत चालणार आहे. 

संयुक्त राष्ट्रातील भारताचे माजी स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरूद्दीन यांनी सांगितलं की, भारताच्या 75 वर्षांच्या इतिहासातील एखाद्या राजकीय नेत्याने, पंतप्रधानांने अशा प्रकारचे संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारणे ही पहिलीच गोष्ट आहे. भारताच्या स्वातंत्र्याला या वर्षी 75 वर्षे होणार असून अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद स्वीकरणार हा दुग्धशर्करा योग आहे.

संयुक्त राष्ट्राच्या नियमांनुसार, सुरक्षा परिषदेतील स्थायी आणि अस्थायी सदस्य राष्ट्रांना क्रमाने अध्यक्षपद दिले जाते. भारत सध्या संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिदषेचा अस्थायी सदस्य देश असून या वेळचे अध्यक्षपद भारताच्या पारड्यात पडलं आहे. त्यामुळे सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला आहे. भारतीय पंतप्रधान व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून या बैठकीचे अध्यक्षपद सांभाळतील तर देशाचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि परराष्ट्र सचिव श्रृंगला हे न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या बैठकीत उपस्थित असतील. 

संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत अशा प्रकारे राजकीय नेतृत्वाने सक्रिय भूमिका घेणं हे सकारात्मक आहे, ते फ्रन्टलाईनवर येऊन त्याने काम करणे यातून एक सकारात्मक संदेश जात असल्याचं संयुक्त राष्ट्रातील भारताचे माजी स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरूद्दीन यांनी सांगितलं....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या