💥गुजरात राज्यातील वडोदरात १० फुटी अजगराने गिळले माकडाला ; सुटका करण्यासाठी नदीत मारल्या उड्या...!


💥अजगराने उलटी करुन माकडाला बाहेर काढलं माकड सध्या योग्य स्थितीत आहे💥

गुजरात राज्यातील वडोदरा येथे तब्बल १० फुटी अजगराला रेस्क्यू करण्यात आलं आहे आज मंगळवार दि.१० ऑगस्ट २०२१ रोजी वनअधिकाऱ्यांना माहिती मिळताच ते घटनास्तळी दाखल झाले आणि अजगराची सुटका केली. 

या अजगराने एका माकडाला गिळलं होतं अशी माहिती वनअधिकाऱ्याने दिली आहे. या अजगराला वन्यजीव अभयारण्यात सोडण्यात येणार आहे.“अजगराने एका माकडाला गिळलं होतं. नंतर सुटका केली असता अजगराने उलटी करुन माकडाला बाहेर काढलं. माकड सध्या योग्य स्थितीत आहे,” अशी माहिती वनविभागाचे अधिकारी शैलेश रावल यांनी म्हटलं आहे. रावल यांनी दिलेल्या माहितीनुसार परवानगी मिळाल्यानंतर वनविभाग या अजगराला अभयारण्यात सोडणार आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या