💥परभणी जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही धावली कोकणातील पुरग्रस्तांच्या मदतीला पुर्णेहून सेवारथ रवाना....!


💥जिल्हाध्यक्ष रुपेश देशमुख यांच्या हस्ते पूरग्रस्त सेवारथाची पूजा करून नारळं फोडून सेवारथास दाखवण्यात आला हिरवा झेंडा💥 


परभणी/पुर्णा ; महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा युवा हिंदुहृदय सम्राट राज ठाकरे यांनी कोकणात उद्भवलेल्या पुरस्थितीत जनतेला जमेल तेवढी मदत करण्याचे आदेश राज्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बहाद्दर मावळ्यांना दिले आपल्या लाडक्या नेत्याने दिलेल्या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करीत परभणी जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बहाद्दर मावळ्यांनीही मानुसकीची भावना जोपासत कोकणातील पुरग्रस्तांच्या मदतीला धाव घेत मागील दोन ते तीन दिवसा पासून परभणी शहर व पूर्णा तालुक्यातील सर्व गावागावत जाऊन अजून अन्न धान्य संकलन करून कोकणातील पूरपरिस्थिती गंभीर असताना तेथील जनजीवन विसकळीत झालेले असताना तेथील जनतेला कुठलाही आसरा उरलेला नाही. ना अंगावर कपडे आहेत, ना ताहानलेल्या मुलाबलांना स्वच्छ पाणी आहे ना झोपेसाठी वसरी आहे हा दु:खाचा डोंगर कोसळलेला असताना आपण त्यांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे याच उद्देशाने पूर्णा व परभणी येथील सर्व मनसे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी कोकनातील पूरग्रस्त भगात मदत करण्यासाठी अन्न धान्य गोळा केले आहे.

मोठ्या प्रमाणात जमलेल अन्न धान्य व अन्य जिवनावश्यक साहित्याने भरलेला पुरग्रस्त सेवारथ आज बुधवार दि.०४ आॕगस्ट २०२१ रोजी सायं.५-३० वाजेच्या सुमारास पुर्णा शहरातील आनंदनगर येथून परभणी जिल्हाध्यक्ष रुपेश सोनटक्के यांच्या हस्ते विधिवत पूजा करीत नारळं फोडून सेवारथास हिरवा झेंडा दाखवून सेवारथ कोकणच्या देशेने रवाना करण्यात आला.


या कार्यक्रमाला मनसे जिल्हा संघटक सोनू लाहोटी,महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हा अध्यक्ष अर्जुन टाक,पुर्णा तालुकाध्यक्ष अनिल बुचाले,पुर्णा शहराध्यक्ष गोविंद (राज) ठाकर,उप शहराध्यक्ष पंकज राठोड,श्रीकांत पाटील,बालाजी वाघ विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष पवन बोबडे,योगेश भोसले,गोविंद भोसले,ज्ञानोबा जाधव,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.... 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या