💥पूर्णेच्या कलाकारांचे आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेत घवघवीत यश...!


💥त्यांच्या यशाबद्दल परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे💥

पूर्णा ; अखिल नटराजन आंतर सांस्कृतिक संघ नागपूर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या जागतिक नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून श्रवण चंद्रकांत बरदाले व यश किशोर गायकवाड यांनी पूर्णेचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकावले आहे.


तर तृतीय क्रमांक शौर्या किशोर कोंडेकर हिने पटकावत पूर्णेकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे,याबद्दल त्यांचा पुर्णेचे जेष्ठ पत्रकार तथा सकाळ वृत्तपत्राचे बातमीदार जगदीश जोगदंड सर यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाप्रमुख विशाल कदम,ब्रम्हकुमारी प्रणिता दिदी, डॉ गुलाब इंगोले,संजय अंभोरे,सिंधू ठाकूर,आदींच्या  वतीने भव्य सत्कार करण्यात आला आहे.

त्यांच्या यशाबद्दल परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या