💥हुजूर साहिब नांदेड - आंध्र प्रदेशातील तिरूपती देवस्थान थेट विमान सेवेला सुरूवात...!


💥नांदेड-परभणी-हिंगोलीसह लातूर जिल्ह्यातून तिरूपतीकडे जाणाऱ्या भाविकांसाठी आनंदाची बातमी💥

नांदेड ; नांदेड येथून आठवड्यातील मंगळवार,बुधवार,गुरूवार या चार दिवशी तिरूपती- हैदराबाद-नांदेड-मुंबई-कोल्हापूर विमानसेवेला सुरुवात झाली असून हे विमान तिरूपती- हैदराबाद-नांदेड-मुंबई-कोल्हापूर असा प्रवास करून त्याच दिवशी त्याच मार्गाने परतीच्या प्रवासासाठी तिरूपतीकडे निघणार आहे.  


सदरील तीन दिवशी सायंकाळी ६.१० मिनिटाला हे विमान नांदेड येथून निघून रात्री ९.१० मिनिटाला ते तिरूपती येथे पोहोचेल. तर तिरूपतीहून याच दिवशी सकाळी ७.०५ वाजता तिरूपतीहून निघणारे हे विमान नांदेडला सकाळी १०.२५ मिनिटाला पोहचणार आहे. त्यानंतर मुंबई - कोल्हापूरसाठी आकाशात झेपावणार आहे. यामुळे भाविकांची मोठी सोय झाली आहे. या विमानाचे किमान भाडे ३,९९९ रुपये आकारण्यात आले. नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केलेल्या प्रयत्नांचे हे फलित असल्यामुळे भाविकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या