💥परभणीत रिपब्लिकन कामगार सेनेने घेतली महाबोधी न्युज चायनलचे पत्रकार प्रदिप नन्नवरे यांच्या कर्तृत्वाची दखल...!


💥शासकीय निमशासकीय मंत्रालय कर्मचारी संघटनेकडून मिळालेल्या पुरस्काराचे औचित्य साधून केला यथोचित सन्मान💥

महाबोधी न्युज चायनलचे मराठवाडा संपर्क प्रमुख तथा पत्रकार प्रदिप नन्नवरे यांच्या कार्याची दखल घेऊन नुकताच अनु.जाती जमाती विमुक्त जाती व भटक्या जमाती इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्ग शासकीय निमशासकीय मंत्रालय कर्मचारी संघटना द्वारा नांदेड येथे आयोजित आरक्षण परिषदेच्या कार्यक्रमात स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला प्रदिप नन्नवरे यांना मिळालेला सन्मान हा संपूर्ण समाजाची मान उंचावणारा सन्मान असल्याने त्यांच्या कर्तृत्वाची रिपब्लिकन कामगार सेनेकडून सुध्दा दखल घेऊन परभणी येथील साखला प्लॉट येथे त्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. या सत्कारावेळी रिपब्लिकन कामगार सेनेचे मराठवाडा अध्यक्ष महेंद्र सानके म्हणाले की प्रदिप नन्नवरे हे जिल्ह्यासह मराठवाड्यात आयोजित विविध धार्मिक सामाजिक,सांस्कृतिक कार्यक्रमांसह शेतकरी,कष्टकरी कामगार तसेच गोरगरीब जनतेच्या व्यथा व वेदना ते सातत्याने सोशल मीडियाच्या व महाबोधी न्युज चायनलच्या माध्यमातून सातत्याने मांडत असतात त्यांच्या या उल्लेखनीय कार्याचे कौतुक अनेक दिग्गजांनी केले आहे सामाजिक बांधीलकिचे भान जोपाणारे महाबोधी नुजचे मराठवाडा संपर्क प्रमुख प्रदिप नन्नवरे यांचा नुकताच मंत्रालय कर्मचारी संघटना अध्यक्ष मा.भारत वानखेड़े यांनी नांदेड येथे सन्मान केला असून हा सन्मान संपूर्ण समाजाचा सन्मान असल्याने आमचे सुध्दा कर्तव्य आहे की आम्ही त्यांना सन्मानीत करून त्यांच्या कर्तृत्वाला प्रोत्साहन द्यावे याच उद्देशाने आज रिपब्लिकन कामगार सेनेच्या वतीने त्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आल्याचेही महेद्र सानके म्हणाले.


या सत्कारावेळी रिपब्लिकन कामगार सेना मराठवाडा अध्यक्ष महेंद्र सानके व लड्डा भाई मितेश शिंदे,मोइन भाई,विजय मुळे,धारण गाव ग्रामपंचायत सदस्य सालवे,झाड़गाव सरपंच नाटकर कुण्डलिक अंभोरे ,शरद एडके राहुल शिंदे मुंजा अगळे,वैभव गायकवाड, पँथर सेना मराठवाडा संपर्क प्रमुख,गजु हरने व आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते..

यावेळी प्रदिप नन्नवरे यांनी सर्व पदाधिकारी यांचे आभार मानले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या