💥औरंगाबाद विभागातील पाच जिल्ह्यांमधून शाळा स्थाटनेसाठी ४२० प्रस्ताव दाखल.....!


💥यातील बहुतांश प्रस्ताव हे इंग्रजी शाळा सुरू करण्यासाठीचे मराठवापुन्हा इंग्रजी शाळांचे पेव💥

औरंगाबाद : करोना महामारीत आकारण्यात येणाऱ्या शुल्कावरून पालक-खासगी शैक्षणिक संस्थाचालकांमध्ये रंगलेला वाद पाहता आता पुन्हा स्वयंअर्थसहाय्यित नव्या शाळा सुरू  करण्यासाठी यावर्षात कोणी पुढे येईल का ? असा प्रश्न निर्माण झालेला असताना नव्या प्रस्तावांचा अक्षरश: पाऊस पडल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली. 

नव्या शाळा सुरू करण्यासाठी औरंगाबाद विभागातील पाच जिल्ह्यांमधून ४२० प्रस्ताव दाखल  झालेले असून बहुतांश प्रस्ताव हे इंग्रजी शाळा सुरू  करण्यासाठीचे आहेत मराठी व उर्दू शाळांचे प्रस्ताव हे बोटावर मोजण्याएवढेच असल्याचे सांगण्यात आले आहे करोनाकाळात मागील दीड वर्षांपासून सर्वच शाळा बंद आहेत आता पुन्हा १७ ऑगस्टपासून शाळा सुरू करण्याचा विचार झालेला असला तरी करोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर बरेचसे अवलंबून आहे करोनाच्या काळात ऑनलाईन शाळा सुरू होत्या शाळेकडून लिंक पाठवल्यानंतरच मुलांचे ज्ञानार्जन सुरू व्हायचे ज्या मुलांनी शुल्क अदा केले त्यांना लिंक पाठवली जायची तर ज्यांचे शुल्क जमा झालेले नाही त्यांचे ऑनलाईन शिक्षण बऱ्याच शाळांनी बंद ठेवले होते. 

अशा अनेक तक्रारी शिक्षण विभागाकडे आलेल्या आहेत विद्यार्थ्यांच्या शुल्कावरून पालक व संबंधित शैक्षणिक संस्थांमध्ये चांगलाच वाद रंगला होता काही वाद मे.न्यायालयापर्यंतही गेले होते मे. न्यायालयाने मध्यम मार्ग सूचवला अशी सर्व पार्श्वभूमी असताना नव्या शाळांच्या प्रस्तावाबाबतचे नेमके चित्र कसे असेल ? असे पाहिले असता औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, बीड, जालना, परभणी व हिंगोली या पाच जिल्ह्यातून नव्या शाळा  सुरू करण्यासाठी ४२० प्रस्ताव शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे दाखल झाले आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या