💥आमदार अंबादास दानवे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली बैठक💥
✍️ मोहन चौकेकर
संभाजीनगर / औरंगाबाद (दि.2 ऑगस्ट 2०21) गुंठेवारी भागातील नागरीकांच्या जागेच्या मालकी हक्का संदर्भात आज दी. 2 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार अंबादास दानवे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित केली होती या बैठकीला जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
बैठकीत आ.अंबादास दानवे यांनी शासनाने नागरीकांच्या लोकहिताचा निर्णय घेतला असल्याने गुंठेवारी भागातील मालकी हक्क संदर्भात शासन निर्णय झालेला आहे. गुंठेवारी भागातील नागरीकांना त्यांच्या जागेचे मालकी हक्क देऊन पी.आर.कार्ड देण्या संदर्भात सुचना केली.
यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी यांसदर्भात सह.संचालक एस.एस.खरवडकर,भुमि अभिलेख विभागाचे सोनार,महानगरपालिकेचे गुंठेवारी विभागाचे संजय चामले यांना सविस्तर असा प्रस्वात तयार करुन शासनास पाठविण्याची सुचना केली व लवकरात लवकर नागरीकांना मालकी हक्क देण्या बाबत कार्यवाही करावी असे आदेश दिले.
यावेळी आ.अंबादास दानवे यांनी पदवीधर अशंकालीन कर्मचाऱ्यांचा कंत्राटी नियुक्ती संदर्भात जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली यावेळी जिल्हाधिकारी यांनी संकेतस्थळावर नियुक्ती बाबतची यादी उपलब्ध करण्यात येतील व लवकरात लवकर नियुक्त्या देण्यात येतील असे संगितले....
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या