💥परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातल्या आहेरगाव अपघात प्रकरणात फिर्यादीच निघाला घातपातातील आरोपी....!


💥सेलुतील प्रसिध्द व्यापारी राहूल कासटला ठोकल्या पोलिसांनी बेड्या ; मे.न्यायालयाने सुनावली २१ आँगस्ट पर्यत कोठडी💥परभणी ;
जिल्ह्यातील सेलू तालूक्यातील आहेरबोरगाव रस्त्यावर झालेल्या घातपाताला तालुक्यातील पोलिस प्रशासनात कार्यरत भ्रष्ट झारीतील शुक्राचार्यांच्या मदतीने अपघाताचे स्वरूप देण्यात आले होते या प्रकरणी मयत संजय करवा यांची पत्नी व या घटनेतील फिर्यादीतील भ्रमणध्वनीवरील संभाषण सोशल मिडियावर सर्वत्र प्रसिध्द झाल्याने या प्रकरणातून तुला बाहेर पडायचे असेल तर २ कोटी रुपयें मोजावे लागतील असे फर्माण उपविभागीय पोलिस अधिकारी राजेद्र पाल व सहकारी कर्मचारी गणेश चव्हाण यांनी १ कोटी ५० लाखांवर तडजोड केली परंतु या हत्येच्या घटनेतील मुजोर फिर्यादी याने 'चोर तर चोर पुन्हा शिरजोर' म्हणीचा प्रत्यय देत उलट निलंबीत व काल कोठडीची हवा खात असलेल्या उपविभागीय पोलिस अधिकारी पाल व पो.ना.चव्हाण विरोधात मुंबई लाचलुचपत प्रतिंबधक विभागाकडे तक्रार दाखल करीत संपूर्ण पोलिस प्रशासनाला आव्हान दिल्यामुळे जिल्ह्याचे कर्तव्यकठोर पोलिस अधिक्षक जयंत मिना यांनी समिती नेमून प्रकरणाचा अखेर छठा लावला या लाचलुचपत प्रकरणास अपघात प्रकरणातील मस्तवाल व्यापारी तथा फिर्यादीच आरोपी असल्याचे उघडकीस आल्याने  पोलीसांच्या प्रदिर्घ  तपासानंतर सेलूतील प्रसिद्ध व्यापारी राहूल भिकूलाल कासट या आरोपीला आज शूक्रवार दि.१३ ऑगस्ट रोजी पोलिसांनी अटक केली. न्यायालयात ऊभे केले असता न्यायलयाने राहूल कासट याला २१ आँगस्ट २०२१ पर्यत पोलीस कोठडीत रवानगी केली....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या