💥गंगाखेड विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट...!


💥गंगाखेड ते लोहासह अन्य रस्त्यांना नितीन गडकरी यांनी ४२० कोटीं रुपयांचा निधी देण्याचे दिले आश्‍वासन💥

परभणी (दि.४ आॕगस्ट २०२१) - गंगाखेड विधानसभेचे आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली या भेटीत गंगाखेड ते लोहा या राष्ट्रीय महामार्गाच्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामाकरिता ३२० कोटी रुपयें तसेच गंगाखेड,कोद्री ते बीड जिल्ह्यातील हद्दीपर्यंच्या रस्ते कामाकरीता १०० कोटी अशा एकूण ४२० कोटी रुपयांच्या कामांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तत्वतः मान्यता दिली असल्याची माहिती आमदार रत्नाकर गुट्टे यांनी दिली आहे.

     या रस्ते कामाकरिता आपण नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री गडकरी यांची भेट घेतली. त्यातून दोन्ही रस्त्याची स्थिती निदर्शनास आणून दिली. या कामांकरिता तरतूद करावी तसेच तात्काळ निविदा काढाव्यात, असा आग्रह धरला. त्यावेळी गडकरी यांनी या रस्ते विकास कामांना तात्काळ मंजूरी देवून, निविदा काढून सुरुवातसुध्दा केली जाईल, असे ठोस आश्‍वासन दिल्याचे आमदार गुट्टे यांनी म्हटले. राष्ट्रीय महामार्ग क्रं३६१ एफ परळी ते गंगाखेड या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामास मंजूरी आहे. पुढील भागास म्हणजे गंगाखेड, पालम ते लोहा या राष्ट्रीय महामार्ग क्रं.३६१ एफ कि.मी. २५७/०० ते २९८/०० या ४१ किलो मीटर रस्त्यांच्या सिमेंटी काँक्रीटीकरणाच्या कामास निधीची गरज आहे. त्यामुळे आपण आग्रह धरला असे ते म्हणाले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या