💥भारत-चीन सीमेच्या रक्षणासाठी लढणाऱ्या इंडो तिबेट सीमा पोलिसांना शौर्य पदके जाहीर...!


💥लडाखमध्ये गेल्या वर्षी दोन देशांच्या लष्करात धुमश्चक्री झाली होती त्यावेळी केलेल्या कामगिरीसाठी त्यांना ही पदके देणार💥

नवी दिल्ली : भारत-चीन सीमेच्या रक्षणासाठी लढणाऱ्या इंडो तिबेट सीमा पोलिसांना शौर्य पदके जाहीर करण्यात आली आहेत पूर्व लडाखमध्ये गेल्या वर्षी दोन देशांच्या लष्करात धुमश्चाक्री झाली होती त्यावेळी केलेल्या कामगिरीसाठी त्यांना ही पदके देण्यात येणार आहेत केंद्र सरकारने केंद्र व राज्यातील पोलीस दलात काम करणाऱ्यांसाठी एकूण  १३८० पदके जाहीर केली आहेत. 

राष्ट्रपतींची ६२८ पोलीस पदके शौर्यासाठी असतात ८८ पदके ही विशिष्ट सेवेसाठी तर इतर ६६२ पदके ही उत्कृष्ट कामगिरीसाठी असतात राष्ट्रपतींच्या शौर्य पदकात केंद्रीय राखीव पोलीस दलांच्या दोन जणांचा समावेश असून त्यात जम्मू व काश्मीरचे पोलीस उपनिरीक्षक अमर दीप व दिवंगत हेड कॉन्स्टेबल सुनील दत्तात्रय काळे यांचा समावेश आहे काळे यांना मरणोत्तर पदक जाहीर करण्यात आले आहे. 

जास्तीत जास्त २५७ पदके दोन सुरक्षा दलांना  मिळाली आहेत ही दोन्ही दले जम्मू-काश्मीरच्या पोलिसांची आहेत केंद्रीय राखीव पोलीस दलात १५१ पदके देण्यात आली २३ शौर्य पदके  ही इंडो तिबेट पोलीस दलाला मिळाली असून यात लडाखमधील संघर्षाशी संबंधित २० पदकांचा समावेश आहे आय.टी.बी.पी.च्या जवानांनी लष्कराच्या खांद्याला खांदा लावून भारत-चीन सीमेचे रक्षण केले होते. 

गलवान खोऱ्यात त्यावेळी मोेठी चकमक झाली होती फिंगर चार भागात लढणाऱ्या सहा जवानांचा यात समावेश असून हॉट स्प्रिंग भागात लढलेल्या सहा जणांना सन्मानित करण्यात आले आहे आय.टी.बी.पी.चे प्रवक्ते विवेककुमार पांडे यांनी सांगितले की आय.टी.बी.पी.ला सर्वात जास्त पदके मिळाली आहेत ती जवानांनी गाजवलेल्या शौर्याचे प्रतीक आहेत पूर्व लडाखमध्ये संघर्षावेळी आय.टी.बी.पी.ने लष्कराला मोलाची साथ दिली होती....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या