💥भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुका कोषाध्यक्ष बळीरामजी कांबळे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन....!


💥ज्येष्ठ समाजसेवक व माजी नगरसेवक नटराज कांबळे यांचे ते वडील होते💥

पूर्णा (दि.5 आॕगस्ट 2021) - भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुका कोषाध्यक्ष माजी श्रामनेर बळीरामजी कांबळे यांचे वयाच्या 79 व्या वर्षी संजीवनी हॉस्पिटल नांदेड या ठिकानी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने उपचारा दरम्यान आज गुरुवार दि 5 ऑगस्ट 2021 रोजी सायंकाळी 04-00 वाजता दुःखद निधन झाले.

भारतीय रेल्वे मध्ये हेड टी एक्स आर या पदावर ते कार्यरत होते सेवानिवृत्तीनंतर भारतीय बौद्ध महासभेला त्यांनी वाहून घेतले होते चैत्यभूमी मुंबई या ठिकाणी  दहा दिवसीय  श्रामनेर दीक्षा घेतली होती पूर्णा तालुका भारतीय बौद्ध महासभेचे माजी कोषाध्यक्ष म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले त्यांच्या पश्चात चार मुले असून ज्येष्ठ समाजसेवक व माजी नगरसेवक नटराज कांबळे यांचे ते वडील होते भारतीय बौद्ध महासभा तालुका व शहर शाखेच्या वतीने त्यांच्या विचाराला व कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली विनम्र अभिवादन...

.या दुःखातून सावरण्याचे सामर्थ्य कांबळे कुटुंबीयांना प्राप्त होवो हिच मनोकामना.

अभिवादक भारतीय बौद्ध महासभा तालुका व शहर शाखा पूर्णा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या