💥मुंबई पोलिसांकडून बॉलिवूड अभिनेता अरमान कोहलीला अटक.....!


💥कोहलीच्या मुंबईतील घरावर छापा टाकला होता त्यावेळी अरमानच्या घरात काही ड्रग्ज अढळून आले💥

बॉलिवूड अभिनेता अरमान कोहलीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे संध्याकाळी अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एन.सी.बी.N.C.B.) अरमान कोहलीच्या मुंबईतील घरावर छापा टाकला होता त्यावेळी अरमानच्या घरात काही ड्रग्ज अढळून आले त्यानंतर अरमानची चौकशी करण्यात आली होती सकाळी मुंबई पोलिसांनी अरमानला या प्रकरणी अटक केली आहे. 

अंमली पदार्थ विरोधी पथकाने हाजी आली परिसरात छापा टाकला होता त्यावेळी त्यांनी ड्रग्ज पेडलर अजय राजू सिंहला अटक केली अजयची चौकशी केल्यानंतर अरमान कोहलीचे नाव समोर आले असल्याचे म्हटले जात आहे त्यानंतर अरमान कोहलीच्या घरावर छापा टाकण्यात आला असून त्याच्या घरात काही अंमली पदार्थ अढळून आले अरमान कोहली ‘बिग बॉस ७’मध्ये सहभागी झाला होता त्यावेळी शोमध्ये त्याने अनेक वादग्रस्त वक्तव्य केली होती. 

त्यानंतर अरमानने बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटात काम केले होते तसेच त्याने ‘दुश्मन जमाना’, ‘कोहरा’, ‘वीर’, ‘जानी दुश्मन’, ‘एलओसी कारगिल’ या चित्रपटांमध्ये ही काम केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या