💥परळीत सारांश अर्बन निधी लि.चा मान्यवरांच्या उपस्थितीत थाटात शुभारंभ...!


💥या संस्थेस उज्वल भविष्य असल्याचे प्रसिध्द ज्योतिष व वास्तुशास्त्र तज्ञ उमेश चंद्रकांत जोशी यांनी सांगितले💥

परळी (प्रतिनीधी)

 परळी शहरात नव्यानेच सुरु झालेल्या असलेल्या सारांश अर्बन निधी लि.परळी वैजनाथ या संस्थेचे पदाधिकारी व सहकार्य करणारे व्यक्ती भविष्याचा वेध घेवुन सामान्य जनतेचे हित जोपासणारे व्यक्ती असल्याने या संस्थेस उज्वल भविष्य असल्याचे प्रसिध्द ज्योतिष व वास्तुशास्त्र तज्ञ उमेश चंद्रकांत जोशी यांनी सांगितले.आज गुरुवार दि.19 रोजी सारांश अर्बन निधी लि.परळीचा मान्यवरांच्या उपस्थितीत थाटात शुभारंभ झाला यावेळी ते बोलत होते.

  अरुणोदय मार्केट येथे सारांश अर्बन निधी लि.परळी च्या शुभारंभ कार्यक्रमास ह.भ.प.प्रभाकर महाराज झोलकर उपस्थित राहुन आशिर्वाद दिले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैद्यनाथ बॅंकेचे माजी चेअरमन अशोक जैन यांची उपस्थिती होती.असुन प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.सदस्य प्रकाशदादा कवठेकर विद्युत कामगार सह.पतसंस्था अंबाजोगाई चे चेअरमन दत्तात्रय गुट्टे,भाजयुमो जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे,जि.प.सदस्य अमरराजे निंबाळकर,भाजपा तालुकाध्यक्ष सतिश मुंडे,कृ.उ.बा.स.संचालक राजेभाऊ फड,नगरसेवक प्रा.पवन मुंडे,वैद्यनाथ बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद खर्चे,अहमदनगर येथील उद्योजक दिपक बांगर यांची उपस्थिती होती. प्रास्ताविकात  विद्युत कामगार सह.पतसंस्था अंबाजोगाई चे चेअरमन दत्तात्रय गुट्टे यांनी ही संस्था उभारणीमागची भुमिका व परिश्रम सांगितले तसेच आज लावलेल्या या रोपट्याचे लवकरच वटवृक्षात रुपांतर होईल असा विश्वास व्यक्त केला.तर अध्यक्षीय भाषणात वैद्यनाथ बॅंकेचे माजी चेअरमन अशोक जैन यांनी परळीतील युवकांनी सुरु केलेली ही संस्था येणार्या काळात जिद्द व चिकाटीच्या जोरावर परळीच्या आर्थिक क्षेत्रात इतिहास घडवेल असे सांगीतले.यावेळी सारांश अर्बन निधी लि.चे अध्यक्ष नरसिंग सिरसाट यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.शुभारंभानिमीत्त सारांश अर्बन निधी लि.संस्थेस परळी शहरातील सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी देवुन शुभेच्छा दिल्या....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या