💥उपमुख्यमंत्री अजित पवार सहकार्य करत नाहीत - यशोमती ठाकूर


💥महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांचा भरसभेत आरोप💥

 महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी भर कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार साथ देत नसल्याचा आरोप केला आहे बालसंगोपन निधी अनुदानात वाढ करण्याच्या प्रस्तावाला उपमुख्यमंत्री अजित पवार साथ देत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालूक्यात आयोजित अन्यायग्रस्त शेतकरी संवाद कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं या कार्यक्रमात महसूल मंत्री बाळासाहेब थोरातदेखील उपस्थित होते. 

बाळासाहेब थोरात यांच्याकडे तक्रार करताना यशोमती ठाकूर यांनी अजित पवार सहकार्य करत नसल्याचा आरोप केला “बालसंगोपनाचे पैसे कित्येक वर्षांपासून वाढलेले नव्हते त्यांना ४५० रुपये मिळत होते आपण काही काळापूर्वी ११२५ रुपये केले आहेत पण माझी अशी इच्छा आहे की, किमान त्यांना २५०० रुपये त्या लेकरांना द्यायला हवे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे असा प्रस्ताव आम्ही पाठवलेला आहे पण उपमुख्यमंत्री आम्हाला पाहिजे तेवढी साथ देत नाहीत तुम्ही जर बोललात तर साथ मिळेल असं यशोमती ठाकूर यांनी यावेळी म्हटलं.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या