💥गंगाखेड शहरातील प्रभागनिहाय लसीकरण मोहिमेचा आज शुभारंभ....!


🔹साईसेवा प्रतिष्ठाण, सवंगडी कट्टा समुहाचा पुढाकार 🔹

गंगाखेड : गंगाखेड शहरातील प्रभागनिहाय लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आज होत आहे. श्री साईसेवा प्रतिष्ठाण आणि सवंगडी कट्टा समुहाने या ऊपक्रमासाठी पुढाकार घेतला असून आता नागरिकांना त्या त्या प्रभागातच लस ऊपलब्ध केली जाणार आहे. 

लसीकरणाचा दर वाढवण्यासाठी शासनाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. साई सेवा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष गोविंद यादव, सवंगडी कट्टा समुहाचे संयोजक रमेश औसेकर यांनी पुढाकार घेत हे लसीकरण फक्त शासकीय रूग्णालयाऐवजी विविध प्रभागात ऊपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. या मागणीस जिल्हा शल्य चिकित्सकांनी परवानगी दिल्यानंतर या भागात घरोघरी जावून नागरिकांची लसीकरणासंदर्भात जनजागृती करून नोंदणी करून घेण्यात आली. यासाठी प्रतिष्ठाणचे साहेबराव चौधरी, प्रथम यादव, एजाज, गणेश जोगदंड, बाळू डमरे, सागर गोरे व त्यांच्या सहकार्यांनी परीश्रम घेतले. 

ऊद्या दिनांक २७ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता गंगाखेड शहरातील या मोहिमेचा शुभारंभ होत आहे. खडकपूरा गल्ली येथील संताजी महाराज मठ आणि संत सावता माळी मंदीर येथे  ऊपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांच्या हस्ते ऊद्धाटन केले जाणार असून या प्रसंगी तहसीलदार स्वरूप कंकाळ, जेष्ठ नेते बाळकाका चौधरी, गंगाखेडचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. हेमंत मुंडे, न. प. मुख्याधिकारी दीपक ईंगोले, न. प. सदस्य नितीन चौधरी यांची प्रमुख ऊपस्थिती असणार आहे. 

या कार्यक्रमास ऊपस्थित राहण्याबरोबरच लसीकरणासाठी, शहरात लसीकरण कॅंप घेण्यासाठी ९४२१५४११११, ९१७५८७११११ या क्रमांकांवर संपर्क साधावा असे आवाहन श्री साईसेवा प्रतिष्ठाण आणि सवंगडी कट्टा समुहाच्या वतीने करण्यात आले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या