💥पुर्णेतील एन.एस.जी कमांडो सुधीर अर्जुन जाधव या कर्तृत्ववान लढवैया जवाना विषयी एका शालेय मित्राने लिहिलेला लेख..!

 


 💥अतिशय खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर NSG मध्ये कमांडो म्हणून प्रवेश होतो💥

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

 गुरुजन आणि मित्रानो नमस्कार...🙏

आज स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येस आपल्या मराठी शाळेतून शिकलेले तसेच पूर्णा शहराचे विर भूमिपुत्र जे आज भारतीय सैन्यात, BSF, ITBP Force,👮‍♂️ दिल्ली पोलिस, महाराष्ट्र पोलीस,🧑‍✈️ रेल्वे सुरक्षा बल* यामध्ये आपले सर्वस्व पणाला लावून प्राणपणाने भारत मातेच्या सेवेत आपले कर्तव्य पार पाडत आहेत, अशा सर्व माजी विद्यार्थ्या समोर नतमस्तक होतो;🙇‍♀त्यांच्या कार्यास त्रिवार नमन करतो.🙏

आपल्या मराठी शाळेचे खूप विद्यार्थी वरील आघाड्यांवर आपले कर्तव्य अगदी निष्ठेने पार पाडत आहेत.  प्रातिनिधिक स्वरूपात आपण त्यातीलच भारत मातेच्या  एका वीर सूपुत्राचा जीवन व कार्य प्रवास पाहणार आहोत.       

💥बालपण व शालेयजीवन ;-

  °°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

श्री. सुधीर अर्जुन जाधव या लढवैय्या शुर जवानाचा जन्म दिनांक 28 ऑक्टोबर 1981 रोजी झाला.लहान वयापासूनच  त्यांना  इतर मुलांप्रमाणे खेळण्या बागडण्यास वेळच मिळाला नाही. त्यांचा बराचसा वेळ आपल्या वडिलांना कामात मदत करण्यात जात असे.  वडील दिवसभर राबत  असत.  काबाडकष्ट करत, नदीवरून रेती आणणे आणि पूर्णा शहरातील बांधकामांना पुरवणे असे  त्यांच्या कामाचे स्वरूप होते.


सुधीरला कळायला लागल्यापासून आपले मोठे बंधू श्री.सुनील जाधव यांच्या समवेत आपल्या वडिलांना मदत करत असत. जिद्द, चिकाटी, कठोर परिश्रम, आणि हाती आलेले काम तडीस नेणे हे गुण सुधीरला आपल्या घरातून उपजत मिळाले होते सुधीर सकाळी लवकर उठून वडिलांना कामात मदत करणे, त्यानंतर दुपारी बारा ते पाचपर्यंत शाळा; त्यानंतर ट्युशन आणि घर असा त्यांचा दिनक्रम असे. 

शालेय स्तरावर जेव्हाही क्रीडा स्पर्धा होत असत,  त्यामध्ये सुधीर अगदी हिरीरीने सहभाग घेत असे. मोठें बंधू सुनील यांचे पाठबळ आणि आपल्या शाळेचे क्रीडा शिक्षक आ.श्री. उकरंडे सर यांचे यथोचित मार्गदर्शन आणि कठीण सराव या बळावर त्यावेळेस सुधीरने *3000 मीटर, 5000 मीटर, 10000 मीटर तसेच 42 किमी.* धावणे, या स्पर्धां मध्ये आपल्या सोबतच आपल्या शाळेचे आणि शहराचे नाव उंचावले आहे. तालुका पातळी ते खुल्या राष्ट्रीय स्तरावर त्याने आपल्या शाळेचे आपल्या पूर्णा शहराचे प्रतिनिधित्व करणारा बहुतेक लांब पल्ल्याचा तो एकमेव धावपटू 🏃🏾🏃🏾त्याकाळात असावा . 

💥कार्य प्रवास ;-

°°°°°°°°°°°°°°

दहावी नंतर अमरावती येथे आयटीबीपी या सुरक्षा दलात भरती सुरू होती.  लहानपणापासूनच देश सेवेचे स्वप्न उराशी बाळगेल्या सुधीरने अर्ज केला. त्यावेळेस सुधिरचे धावण्याच्या स्पर्धेत मिळवलेल्या विशेष प्राविण्य प्रमाणपत्र पाहून तेथे उपस्थित अधिकारीही आश्चर्य चकित झाले. त्यानंतर झालेल्या सर्व मैदानी स्पर्धा प्रकारात तो पात्र ठरला आणि देशभक्तीपर कार्याचा, आपल्या देशाप्रती असलेल्या कर्तव्य निष्ठेचा एक नवा अध्याय सुधीर  यांच्या जीवनात सुरू झाला सन 2000 मध्ये ITBP Force मध्ये रुजू झाल्यानंतर सुधिरची पहिली पोस्टिंग सिमला येथे झाली. तेथील 3 वर्षाचा कालावधी यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर पुढील प्रशिक्षणासाठी त्यांना चंदिगढ येथे पाठवण्यात आले. तेथेही त्यांनी कठोर परिश्रम घेतले. 

त्यांची पुढील नेमणूक उत्तराखंड येथे झाली. तेथे कैलाश मानसरोवर येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कडक सुरक्षा व्यवस्था पुरवताना, त्या यात्रेकरूंना सुरक्षितपणे घेऊन जाणे व परत आणणे आणि हे त्यांना पायीच करावे लागत होते. या कामात त्यांना अगदी 7-7 दिवस पायी चालावे लागत असे; पण सुधीर च्या ध्येय निष्ठेपुढे हे काही नव्हते. त्यानंतर पुढे जवाहर Tunnel श्रीनगर येथे कर्तव्य बजावले. तेथे जवळपास 7 किमी लांबीचा भुयारी मार्ग आहे तेथूनच भाविक अमरधाम यात्रेस मार्गक्रमण करतात त्यानंतर त्यांनी पुढील तीन वर्ष जम्मू काश्मीर येथील उधमपूर येथे कर्तव्य बजावले. तेथील तीन वर्ष संपल्यानंतर पुढील तीन वर्षासाठी लद्दाख च्या बर्फाळ प्रदेशात त्यांची पोस्टिंग झाली.

पुढे त्यांची निवड National Security Guard या अतिशय प्रतिष्ठित संस्थे  मध्ये झाली. आपल्याला आठवत असेल मुंबई वर जेव्हा हल्ला झाला होता तेव्हा याच NSG कमांडोस नी ताज आणि ओबेरॉय हॉटेल🏨 च्या परिसरात आपल्या अदभुत शौर्य आणि साहस दाखविले होते आपल्याच शाळेचे आणि पुर्णेचे आणखी एक भूमिपुत्र *श्री.संजय गायकवाड* यांनीही जवळपास पाच वर्ष NSG कमांडो म्हणून सेवा दिली आहे, हेही इथे विशेष कौतुकास्पद आहे.

💥अतिशय खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर NSG मध्ये कमांडो म्हणून प्रवेश होतो💥

त्यात *VIP PROTECTION, ZED PLUS*  दर्जाच्या सुरक्षा चे कर्तव्य बजावले.  तत्कालीन केंद्रीय वाणिज्य मंत्री श्री. कमलनाथ यांच्या सुरक्षा ताफ्यात सुधीर यांचा समावेश होता. हा कालावधी जवळपास पाच वर्षाचा होता.  तोही यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर त्यांची पुढील पोस्टिंग छत्तीसगढ च्या नक्षलवादी भागात झाली होती. तेथील आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करत; विविध संकटाशी दोन हात करत त्यांनी आपले देशाप्रतीचे कर्तव्य निष्ठेने पार पाडले. तेथून पुढे त्यांची पोस्टिंग हरियाणा येथे झाली पुढे तीन वर्ष सेंट्रल जेल मांडोली येथे सुरक्षा व्यवस्था पार पडत आपली सेवा दिली. 

सुधीर सध्या आसाम येथे भारत आणि चीन च्या सीमेवर सेवा बजावत आहेत. जंगलाने वेढलेला भूभाग आणि केळी व्यतिरिक्त कुठलेही फळ किंवा भाजी न भेटणारे ठिकाण . पाऊस जर सुरू झाला तर सतत पंधरा ते वीस दिवस पडणार;🌧️🌧️ आणि पाऊस उघडल्यावर उन्हाचा उकाडा एवढं असतो की शरीरातून घामाच्या धारा वाहू लागतात. ♨️🥵

💥आजपर्यंत भारत मातेच्या रक्षणार्थ 22 वर्ष सेवा पूर्ण केली आहे 🙏

अशा या पूर्णेच्या भूमिपुत्राच्या व  आपल्या रेल्वे मराठी शाळेच्या विद्यार्थ्यावर आपल्याला , आपल्या शाळेस आणि आपल्या गावास सार्थ अभिमान आहे.👏🙌

सुधीर आणि त्यांच्या सारख्या भारतमातेच्या सेवेत असणाऱ्या असंख्य शूरवीर आणि कर्तव्यदक्ष सैनिकांना लेखिका अनुराधा प्रभुदेसाई यांच्या," सैनिक" या पुस्तकातील पुढील पंक्ती समर्पित करीत आहे.    

भारतीय सैनिक* शौर्य, निर्धार आणि निष्ठा, यांचं मूर्तिमंत प्रतीक. सियाचीनच्या उणे पन्नास अंशापासून रणरणत्या वाळवंटाच्या अधिक पन्नास अंश centigrade तापमनापर्यंत. असीम आकाशातून अथांग सागरा पर्यंत, आपल्या पराक्रमाचा ठसा उमटवणारे सैनिक. देशाच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून त्याचा जागता पहारा असतो. म्हणून तुम्ही आपल्या उबदार घरात सुखाची झोप घेऊ शकता....

दगाबाज दुष्मनाचा वार तो आपल्या निधड्या छातीवर झेलतो; म्हणून तुम्ही- आम्ही, जल्लोषात आणि उत्साहात; उत्सव अन उरूस, सण आणि समारंभ साजरे करू शकतो. असा हा भावनेपेक्षा, कर्तव्य श्रेष्ठ मानणारा कर्तव्य कठोर निश्चय यातही माणूसपणाची कोवलिक जपणारा, तुमच्या उद्यासाठी आपला आज देणारा सैनिक .....👮‍♂️

सर्व सैनिकांना  त्रिवार नमन.....🙏🙏🙏 

🇮🇳 *जय हिंद* 🇮🇳

✍🏻 हर्षवर्धन बागुल

 एस.एस.सी. बॅच - 1994

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या