💥म्हाडाच्या ८,२०० सदनिकाधारकांचे पुनर्वसन मार्गी,१४ हजार गाळे विक्रीसाठी तयार....!


💥गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडा आणि झोपुच्या योजनांचा आढावा घेताना बुधवारी ही माहिती दिली💥

मुंबई : गेल्या काही महिन्यात म्हाडाच्या प्रकल्पांना गती दिल्याने ८,२०० म्हाडा सदनिकाधारकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागला असून १४ हजार गाळे नव्याने विक्रीसाठी तयार होणार आहेत यामुळे म्हाडाच्या गंगाजळीतही २,०३४ हजार कोटींची भर पडली आहे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडा आणि झोपुच्या योजनांचा आढावा घेताना बुधवारी ही माहिती दिली २५ महिन्यात म्हाडाकडे  ५८५ कोटी रुपयांचा अधिमुल्य महसूल जमा झाला. 


परंतु, १४ जानेवारी ते १९ ऑगस्ट २०२१ या कालावधीत नवीन १८२ व जुने १७३ अशा एकूण ३५५ संस्थांना देकार पत्र जारी करण्यात आले असून १,११४ कोटी रुपये इतका विक्रमी महसूल जमा झाला आहे अशी माहिती आव्हाड यांनी दिली २०१७ पासून म्हाडाच्या तिजोरीत जमा झालेल्या २,०३४ कोटी निधीमुळे बी.डी.डी.चाळींसारख्या प्रकल्पांना चालना देणे शक्य होईल असे आव्हाड यांनी सांगितले २०१७पासून ३५५ सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या सुमारे ८,५२० मुळ सभासदांचे पुनर्वसन होऊन ४५ चौ.मी. चटई क्षेत्रफळाचे अंदाजे १४ हजार विक्री गाळे म्हाडाच्या विविध वसाहतींमध्ये उपलब्ध होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 

पुढील २-३ वर्षांंमध्ये साधारणत: २५ हजार  घरे उपलब्ध होणार असल्यामुळे बांधकाम उद्योगातील विविध घटकांना रोजगार उपलब्ध होईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली झोपु योजनेतही २०१९-२० या वर्षांत ८,६०२, २०२०-२१ मध्ये १३,८७५ तर एप्रिल २०२१ ते आजतागायत ५,६८५ सदनिकांना भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे व ९२ हजार लोकांना याचा फायदा झाल्याची माहिती आव्हाड यांनी दिली सरकारच्या तिजोरीतही भर म्हाडाच्या विक्री गाळ्यांचे मुद्रांक शुल्क खरेदीदारांऐवजी विकासकामार्फत भरायचे आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या