💥राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे डिझेलसाठी पैसे नाहीत ; सक्तीची रजा घेण्याची कर्मचाऱ्यांना सूचना...!


💥गेल्या काही महिन्यांपासून पगाराच्या विलंबामुळे एस.टी.कामगारांना पैशांची गंभीर समस्या भेडसावू लागली आहे💥

मुंबई ; १८,००० एस.टी. बसचा ताफा असणारे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सध्या एकाच वेळी अनेक संकटाचा सामना करत आहे डिझेलसाठी पैसे नसल्याने रद्द केलेल्या एस.टी. बसवर असणाऱ्या चालक आणि कंडक्टरना रजा घेण्यास सांगण्यात आल्याचा आरोप युनियनने केला आहे हजारो प्रवासी गणेशोस्तवासाठी जाण्यासाठी रांगेत उभे असतानाही गेल्या काही महिन्यांपासून पगाराच्या विलंबामुळे एस.टी.कामगारांना पैशांची गंभीर समस्या भेडसावू लागली आहे. 

मिड डेच्या वृत्तानुसार कामगार संघटना संथ गतीने सुरु असलेल्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाबद्दल चिंता व्यक्त करत आहेत “काही महिन्यांपासून वेतन विलंबित आहे पुढचा पगार कधी येईल हा प्रश्न नेहमीच असतो बस चालवण्यासाठी डिझेलसाठी पैसे नाहीत आणि यामुळे बस रद्द झाल्यावर कर्मचाऱ्यांना सुट्टी घेण्यास सांगितले जाते हे एक संकट आहे असे महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे म्हणाले “चिंतेचे आणखी एक बाब म्हणजे कर्मचाऱ्यांचे लसीकरण. ९७,००० कर्मचारी सदस्यांपैकी सुमारे ५५,५१६ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे, जे फक्त ५० टक्के आहे. 

आता ही प्रक्रिया आणखी मंदावली आहे कारण स्थानिक पातळीवर अनेक वेळा, आगार व्यवस्थापक लसीकरणासाठी आवश्यक सुट्टी देत नाहीत जालना,लातूर,अमरावती, बुलढाणा आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये लसीकरणाबाबत निराशाजनक परिस्थिती झाली आहे एम.एस.आर.टी.सी.च्या केवळ २० टक्के कर्मचाऱ्यांनी लसीकरण केले आहे असे बर्गे यांनी सांगितले या दरम्यान,एम.एस.आर.टी.ने गणेश उत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी २,२०० जादा बस चालवण्याची योजना आखली आहे. 

परतीच्या प्रवासासाठी १४ सप्टेंबर ते २० सप्टेंबर दरम्यान एस.टी. बस असणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या