💥सावधान : डिमार्ट च्या नावाची खोटी लिंक क्लिक कराल तर बँक खाते होईल रिकामे...! 💥रत्नागिरीतील अनेकांची झाली फसवणूक💥

रत्नागिरी : ऑनलाईन खरेदीच्या नावावर फसवणूकीचे प्रकार सातत्याने वाढत असून आतातर वर्धापण दिना निमित्त फ्रि गिफ्टची लालूच दाखवून लुटण्याचे प्रकार ही समोर येत असून असाच रत्नागिरी येथे झाल्याचे उघडकीस आले आहे. सुप्रसिद्ध डिपार्टमेंटल स्टोअर्स डिमार्ट च्या 20 व्या वर्धापन दिनानिमित्त फ्री गिफ्ट मिळावा असे आमिष दाखवणारी एक लिंक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी या लिंकवर क्लिक करून आपल्या बँक खात्यासंबंधी माहिती भरल्याने खात्यातील रक्कम गेल्याच्या घटना रत्नागिरीत घडत आहेत. नागरिकांनी वेळीच सावध होत अशा लिंक व्हायरल करू नये व क्लिक करून कोणतीही माहिती भरू नये. या लिंकवर विश्वास ठेवून रत्नागिरीतील अनेकांची फसगत झाली असल्याचे निदर्शनास येत आहे.

धन्यवाद साभार ; रत्नगीरी खबरदार

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या