💥राष्ट्रीय लोक अदालत मध्ये वाशिम जिल्ह्यातील एकून ७५६ कोर्ट प्रलंबित प्रकरणांचा निपटारा...!


💥त्याअनुषंगाने दि.०१.०८.२०२१ रोजी शासनातर्फे राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले होते💥

(फुलचंद भगत)

वाशिम:- जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक वसंत परदेशी यांनी वाशिम जिल्हा पोलीस दलाचा पदभार स्विकारल्या पासून वाशिम पोलीसांकडे तपासासाठी असलेल्या गुन्ह्यांमध्ये जास्तीत जास्त दोष सिध्द होऊन बेकायदेशीर कृत्य करणारांवर वचक निर्माण व्हावा याकरीता मागील २ वर्षा पासून सातत्याने प्रयत्न करण्यात येत होते. त्यासाठी त्यांनी वेळोवेळी तपास पथक, समीती व कन्व्हीवशन सेलची स्थापना,तसेच कोर्ट प्रलंबित प्रकरणे निकाली निघावेत याकरीता प्राप्त समन्स/वॉरंट १००% बजावणी करुन त्यातील आरोपीतांना मा.न्यायालयाचे समक्ष हजर राहणे करीता वेळोवेळी पोलीस ठाणे स्तरावर तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी यांचे समन्स/वॉरंट पथक तयार करुन जास्तीत जास्त आरोपी मा.न्यायालयासमोर हजर करुन जास्तीत जास्त गुन्हे उघडकीस आणून प्रलंबित प्रकरणाचा निपटारा करण्यावर जास्त भर दिला.

त्याअनुषंगाने दि.०१.०८.२०२१ रोजी शासनातर्फे राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये मा.न्यायालयात किरकोळ कारणांवरुन कोर्ट प्रलंबित असलेल्या दिवाणी व फौजदारी प्रकरणांमध्ये समझोता करुन प्रकरण निकाली काढण्यात आले.मा.पोलीस अधिक्षक वसंत परदेशी, मा.अपर पोलीस अधिक्षक विजय कुमार चव्हाणयांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी वाशिम,मंगरुळपीर केडगे उपविभागीय पोलीस अधिकारी,कारंजा श्री.ठाकरे यांच्या देखरेखीखाली जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांनी आपले अधिनस्त पोलीस अंमलदार यांचे मदतीने कलम-१८८, २६९, २७० भादंवि च्या २७८ केसेस, २८३,३४१ भादंवि च्या ०६ केसेस, कलम-१२ (अ) महाराष्ट्र जुगार कायद्याच्या ६७ केसेस, व कलम-१८४, १८५ मो.वा.का.च्या ११ केसेस, ६६/१९२ मो.वा.का.च्या ३९४ केसेस अशा प्रकारे एकून ७५६ प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये निकाली काढण्यात आली आहेत.सदर कार्यवाही मध्ये मा.पोलीस अधिक्षक वसंत परदेशी, मा.अपर पोलीस अधिक्षक विजय कुमार चव्हाण यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी वाशिम,मंगरुळपीर केडगे,उपविभागीय पोलीस अधिकारी कारंजा ठाकरे जि.वा.शा.चे पोनि.विजय पाटकर, श.वा.शा.चे सपोनि नागेश मोहोड, पो.स्टे वाशिम शहरचे पोउपनि.संतोष जीजाळ,पोकॉ.विठ्ठल दागडे,म.पोकॉ.संगीता मडावी, पो.स्टे.मालेगांवचे पोहेकॉ.जायभाये, पो.स्टे.रिसोडचे एएसआय बळीराम सानप,नापोकॉ.परमानंद जायभाये, पो.स्टे.मंगरुळपीर कडून म.पोकॉ.सुप्रिया डोंगरे, नापोकॉ.आसीफ व तसेच टिएमसी सेलचे एएसआय दामोधर डौलसे, नापोकों.संतोष निखोड यांनी सहभाग नोंदविला.


प्रतिनिधी-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या