💥राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष आ.बाबाजानी दुर्रांनींना जिवे मारण्याची धमकी....!


💥आ दुर्रानी यांची तक्रार;पाथरी पोलीसात गुन्हा दाखल💥

किरण घुंबरे पाटील

पाथरी:-मागील काही दिवसा पासुन परभणी येथील बाळासाहेब हरीभाऊ जाधव हे माझ्या विरोधात अश्लील शिवराळ भाषा वापरत दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी चिथावनीखोर भाषा जाहिररित्या वापरत व्हिडिओ तयार करून सोशल मिडियात माझी बदनामी करत मला जाहिररीत्या जिवे मारण्याचे धमकी देत आहे अशी तक्रार विधानपरिषदेचे आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी शनिवारी रात्री ८.०५ वा पाथरी पोलीसात दिल्याने बाळासाहेब हरीभाऊ जाधव रा परभणी यांच्या विरोधात पाथरी पोलीसात विविध कलमां खाली गुन्हा दाखल झाला आहे.


या विषयी आ बाबाजानी दुर्रानी यांनी दिलेल्या तक्रारी वरून पाथरी पोलीसांनी घेतलेली तक्रार पुढील प्रमाणे जशास तशी----

21/08/2021 मी अब्दुल्लाखान उर्फ बाबाजानी लतीफखान दुर्राणी वय ६४ वर्षे, जात-मुस्लीम, व्यवसाय शेती व आमदार (महाराष्ट्र विधान परीषद सदस्य रा. फक्राबाद मोहला पाथरी ता. पाथरी जि. परभणी मो. 9545871010 येवुन तोंडी सांगुन तक्रार देतो की, मी वरील ठिकाणचा राहणारा असून मागील १४ वर्षा पासून विधिमंडळ सदस्य आहे. समक्ष पो.स्टे. ला मागील १४ वर्षापासून मी पाथरी तसेच परभणी, हिंगोली महाराष्ट्र विभागातुन एकुण तिनवेळा विधान परीषद व विधानसभा सदस्य म्हणून निवडुन आलो आहे. माझ्या आता पावेतोच्या कार्यकाळात मी पाथरी तालुका तसेच परभणी व हिंगोली जिल्हयात शासकीय योजनेव्दारे विविध विकास कामे केले आहे. त्याच बरोबर पाथरी तालुक्यातील तसेच परभणी जिल्हयातील -मुस्लीमच्या पवीत्र ठिकाणाचा जिर्णोध्दार / विकास कामे केलेले आहेत. तसेच परभणी, हिंगोली जिल्ह्यातील सर्वच समाजातील लोकांचे मला समर्थन व पाठींबा आहे. या सर्वबाबी असताना मला समाजात बदनाम करण्याचे उद्देशाने परभणी येथील एक कथाकथीत तसेच स्वयंघोषीत नेते समजले जाणारे बाळासाहेब हरिभाउ जाधव रा. परभणी हा माझ्याविरुध्द काहीतरी कारस्तान करून मला औरंगजेब, औरंगजेबाचा सख्या भाउ, हिरवा साप, बैल, गाय कापणारा खाटीक व लांडया असे शब्द प्रयोग करून माझी समाजात बदनामी केली आहे व दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे उद्देशाने तसेच जातीय दंगल घढवुन आणण्याचे उद्देशाने वरील शब्द प्रयोग करून त्याच्या व्हिडीओ क्लीप तयार करुण सोशल मिडीयावर प्रसारीत केला आहे व माझी प्रतीमा मलीन केली आहे. तसेच बाळासाहेब जाधव हा मागील सहा महिण्यापासून त्याला वाटेल त्या पध्दतीने वेगवेगळ्या गावी जावुन तसेच सोशल मिडीयावर व्हिडीओ क्लीप टाकुण त्यात माझे नाव उच्चारले आहे. तसेच पाथरी शहराची लोकसंख्या वाढत आहे व पाथरी शहरातील उदयोग व्यापार वाढत आहेत त्यामुळे म पाथरी तालुक्याचा विकास व्हावा या दुष्टीकोणातुन नगर परीषद पाथरी तर्फे देवनांद्रा ग्रामपंचायत परीसराचा काही भाग हदवाढी साठी प्रस्तावीत केला आहे. या प्रस्तावाला स्थानीक नागरीकाचा सुध्दा पाठींबा आहे. पाथरी तालुक्याच्या विकासाचे दुष्टीकोणातुन शासनाने सदर प्रस्ताव मान्यही केले आहेत परंतु शहराचा विकासाचा मुद्दा बाजुला ठेवून बाळासाहेब जाधव याने रेणुका सहकारी साखर कारखाना हा पाथरी नगर परीषद हदीत आल्यास शेतकयांचे नुकसान होईल व कारखाना बंद पडेल व पाथरीचा औरंगजेबचा कारखान्याच्या जमीनीवर डोळा आहे. अशी खोटी भाषणे करून लोकाच्या भावना भडकवीत असुन माझी बदनामी करून माझी प्रतीमा मलीन केली आहे. तसेच मला घरात घुसुन मारेन, रस्त्यावर मारेन, ठेचुन काढेल असे वक्तव्य करून मला उघड उघड धमकी देत आहेत. याबाबत पाथरी तालुक्यातील व परभणी जिल्हयातील माझ्यावर  प्रेम करणारे सर्व समाजातील लोक तसेच समाजातील सुजान नागरीक माझ्याकडे येवुन साहेब बाळासाहेब जाधव यांची अशी अपप्रवृत्ती बंद करा अशी विनंती करीत आहेत परंतु आज पर्यन्त मी याबाबत कुठल्याही स्वरुपाचा कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये म्हणुन या गोष्टीकडे दुर्लक्ष केले आहे. म्हणुन दिवसें दिवस बाळासाहेब हरीभाउ जाधव रा. परभणी हा गावोगावी जावून माझ्याबाबतीत चिथावणी खोर भाषणे देवुन लोकोच्या भावना भडकवुन माझ्या जातीवाचक शब्दप्रयोग करून धर्मा धर्मामध्ये जातीय तेढ निर्माण व्हावा या उद्देशाने शांतता भंग व्हावा याचा प्रयत्न करीत आहेत. याचा परीणाम दोन समाजामध्ये भांडणे होवुन गंभीर स्वरूपाचे प्रकरण घडण्याची शक्यता नाकरता येत नाही. त्यामुळे जातीय दंगल घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी दिनांक १३/०७/२०२१ रोजी दुपारी एक वाजण्याचे सुमारास व दिनांक २०/०८/२०२१ रोजी सांयकाळी ७.००वा सुमारास मला हिरवा साप, औरंगजेबाचे सख्खा भाउ, लांडया, असे अश्लिल शिवीगाळ करून दोन समाजात तेढ निर्माण होण्याचे उद्देशाने व्हिडीओ तयार करुन सदर व्हिडीओ फेसबुकवर टाकुन माझी बदनामी केली आहे. तसेच मला उघड उघड घरात घुसुन मारेन, रस्त्यावर मारेन ठेचुन काढेण असे जिवे मारण्याची धमकी दिली आहे. म्हणून माझी बाळासाहेब हरीभाऊ जाधव यांचे विरुध्द फिर्याद आहे. 

अशा प्रकारे आ बाबाजानी दुर्रानी यांनी पाथरी पोलीसात तक्रार दिल्याने पाथरी पोलीसांनी आज शनिवार रोजी रात्री ८ वाजून पाच मिनिटांनी ही तक्रार नोंदवून घेत बाळासाहेब हरीभाऊ जाधव रा परभणी यांच्या विरुद्ध भा दं संहिता १८६० चे कलम १५३-ए ,२९५-ए ,२९४,५०६ नुसार पो नि वसंत डी चव्हाण यांनी गुन्हा दाखल करुन तपासाची सुत्रे हाती घेतली असल्याची माहिती सुत्रांनी दिली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या