💥भारतीय स्टेट बँक खातेदारांसाठी सूचना ; महत्त्वाचं काम लवकर करा कारण….!


💥एसबीआय ६ ऑगस्ट २०२१ रोजी रात्री १० वाजून ४५ मिनिटांपासून ७ ऑगस्टला मध्यरात्री १ वाजून १५ पर्यंत देखभालीचं काम हाती घेणार💥 

भारतीय स्टेट बँके मार्फत डिजिटल व्यवहार करणाऱ्या खातेदारांसाठी बँकेनं महत्त्वाची सूचना दिली आहे खातेदारांना यू.पी.आय., इंटरनेट बँकिंक, योनो आणि योन लाइट सुविधा वापरताना काही तास अडचणीचा सामना करावा लागणार आहे एस.बी.आय. ६ ऑगस्ट २०२१ रोजी रात्री १० वाजून ४५ मिनिटांपासून ७ ऑगस्टला मध्यरात्री १ वाजून १५ पर्यंत देखभालीचं काम हाती घेणार आहे त्यामुळे ऑनलाइन सुविधा वापरता येणार नाहीत जवळपास दोन तास ही सुविधा बंद असणार आहे. 

बँकेनं खातेदारांना याबाबतची आगाऊ सूचना दिली आहे “बँक ६ ऑगस्ट २०२१ ला रात्री १०.४५ ते ७ ऑगस्टला रात्री १.४५ मिनिटापर्यंत देखभालीचं काम करणार आहे जवळपास १५० मिनिटं आपल्याला सुविधा मिळणार नाही बँकिंग सुविधा अपग्रेड करण्याचा आमचा प्रयत्न आहे.”असं ट्वीट एस.बी.आय.नं केलं आहे. 

यापूर्वी १६ जुलै, १३ जूनला एसबीआयने देखभालीचं काम हाती घेतलं होतं मे महिन्यातही एस.बी.आय.ची योनो, योनो लाइट इंटरनेट बँकिंग, यूनिफाइड पेमेंटसह डिजिटल बँकिंग खंडित झाली होती एस.बी.आय. देशातील सर्वात मोठी बँक आहे एस.बी.आय.च्या देशात २२ हजाराहून अधिक शाखा आहेत तसेच ५७ हजार ८८९ ए.टी.एम.आहेत तर इटरनेट बँकिंग ८.५ कोटी आणि मोबाईल बँकिंगचा उपयोग १.९ कोटी खातेदार करत आहेत तर यू.पी.आय.चा वापर करणाऱ्या खातेदारांची संख्या १३.५ कोटी आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या